(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Cup 2023 : विश्वचषकाच्या पदार्पणातच गोल्डन डक, शुभमन गिलच्या जागी संधी मिळालेल्या ईशान किशनची बॅट चालणार?
World Cup 2023 : सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) च्या जागी संधी मिळालेला ईशान किशन (Ishan Kishan) सामन्यात शून्यावर बाद झाला. त्याला दुसऱ्या सामन्यात चांगली खेळी करावी लागणार आहे.
Ishan Kishan, India vs Afghanistan : विश्वचषकात (World Cup 2023) पदार्पणाच्या (Debut Match) सामन्यात युवा खेळाडू ईशान किशन (Ishan Kishan) च्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे. सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) च्या जागी ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) विरुद्धच्या सामन्यात ईशान किशनला संधी मिळाली. पण, ईशान किशन (Team India) विश्वचषकात पदार्पणाच्या सामन्यातच शून्यावर बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा (Australia) गोलंदाज मिशेल स्टार्क (Mitchell Starc) ने ईशान किशनला गोल्डन डक (Ishan Kishan Golden Duck) केलं. यानंतर आता दुसऱ्या सामन्यात ईशान किशनला मिळालेल्या संधीचं सोनं करता येणार आहे का, हे पाहावं लागणार आहे.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान आमने-सामने
टीम इंडियाचा दुसरा सामना 11 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दुपारी 2 वाजता हा सामना होणार आहे. हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, पण याआधी भारतीय संघाची चिंता वाढली आहे. सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाल्याने तो या सामन्यातून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात पहिल्याच सामन्यात भारताची टॉप ऑर्डर फेल गेली. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्धच्या टॉप ऑर्डर फलंदाजांवर दबाव असणार आहे.
ईशान किशनची बॅट चालणार?
टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाल्याने तो विश्वचषकात भारताच्या सलामी सामन्याला मुकला. सलामीवीर म्हणून चांगला रेकॉर्ड असल्याने गिलच्या जागी ईशान किशनला संधी देण्यात आली. पण, या सामन्यात ईशान शून्यावर बाद झाला. त्यामुळे ईशान किशनला सलामीवीर म्हणून निवडीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. विश्वचषकामध्ये प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये लीग टप्प्यातील टीम इंडियाचे 8 सामने बाकी आहेत. भारताच्या आगामी सामन्यात ईशान किशनला चांगली खेळी करावी लागणार आहे.
टीम इंडियासाठी चिंतेची बाब
ईशान किशनला सलामीवीर म्हणून खात न उघडता येणे टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात ईशान किशन, रोहित शर्माआणि श्रेयस अय्यर खातं न उघडला तंबूत परतले. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 200 धावांचा पाठलाग करताना, ईशान किशन हा पहिल्यादा बाद झाला. यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरही माघारी परतले. भारतीय संघाने दोन धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. हाच कल असाच सुरू राहिला तर टीम इंडियाच्या आणखी वाढेल. मात्र, 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी शुभमन गिल सज्ज होईल की नाही याबाबत अद्याप बीसीसीआयकडून कोणतीही अपडेट समोर आलेली नाही.
शुभमन गिल कधी बरा होणार?
ईशान किशन, रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्याशिवाय टीम इंडियाकडे इतर सलामीवीर नाही ही समस्या आहे. केएल राहुलनेही सलामीला उतरल्यास, मधली फळई कमकुवत होईल. राहुल सध्या मधल्या फळीत चांगली फलंदाजी करत आहे, त्यामुळे त्याच्याशी छेडछाड करता येणार नाही. शुभमन गिल किती लवकर बरा होऊन पुन्हा प्लेईंग इलेव्हनचा भाग बनू शकेल, हे येत्या काही दिवसांतच कळेल.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत
टीम इंडिया सलामी सामन्यात विजय मिळवल्यानंतर आता अफगाणिस्तान विरुद्ध मैदानात उतरणार आहे. 11 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना रंगणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे.