IND vs SA T20 WC : मार्करम-मिलर जोडीची विजयी खेळी, दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 5 गडी राखून विजय
IND vs SA T20 : ऑस्ट्रेलियाच्या पर्थ येथे पार पडलेला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना अखेरच्या षटकापर्यंत गेला. पण अखेर सामन्याचा निकाल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनेच लागला.
India vs South africa : टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cp 2022) ऑस्ट्रेलियाच्या पर्थ येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात अटीतटीचा सामना पार पडला. अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यात अखेर निकाल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने लागला. ज्यामुळे भारताला सामना 5 विकेट्सने गमवावा लागला. सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारत केवळ 133 धावाच करु शकला. ज्या डिफेन्ड करताना भारताने चांगली झुंज दिली, पण अखेर 5 विकेट्सने भारताला सामना गमवावा लागला.
#TeamIndia fought hard but it was South Africa who won the match.
— BCCI (@BCCI) October 30, 2022
We will look to bounce back in our next game of the #T20WorldCup . 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/KBtNIk6J16 #INDvSA pic.twitter.com/Q6NGoZokuE
सेमीफायनल एन्ट्रीसाठी आजचा सामना तसा महत्त्वाचा होता. भारतानं आधी पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्ध सामने जिंकले होते, त्यामुळे गुणतालिकेत भारत वरचढ होता. आजच्या विजयानंतर भारताची सेमीफायनलमध्ये जागा बऱ्यापैकी निश्चित झाली असती. पण हाच सामना भारतानं गमावला, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेनं सेमीफायनलच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकलं आहे. तर आजच्या सामन्यात सर्वात आधी भारतानं नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. पण भारताची सुरुवातच खराब झाली सलामीवीरापासून निम्मा संघ 50 धावा होण्याच्या आतच तंबूत परतला. यावेळी सर्वात आधी रोहित शर्मा 15 धावांवर मग राहुल 9 धावांवर त्यानंतर विराट कोहली 12 रन करुन आणि मग हुडा शून्य तर हार्दिक पांड्या 2 धावा करुन तंबूत परतला. ज्यानंतर सूर्युकमार आणि दिनेश कार्तिक यांनी भारताचा डाव सावरला. सूर्या फटकेबाजी करत होता तर दिनेश केवळ त्याला साथ देत होता. पण अखेर कार्तिक 6 रन करुन बाद झाला. ज्यानंतर आश्विन, भुवनेश्वर, शमी अशा साऱ्यांनी साथ देण्याचा प्रयत्न केला पण ते खास कामगिरी करु शकले नाही. सूर्यकुमारही 40 चेंडूत 68 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर मात्र भारत केवळ 133 धावांपर्यंत मजल मारु शकला.
ज्यानंतर 134 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारताची सुरुवात उत्तम झाली. भारताकडून दुसरी ओव्हर टाकताना अर्शदीपने दोन महत्त्वाचे विकेट्स घेतले. 6 ओव्हरमध्ये 24 रनांवर दक्षिण आफ्रिकेचे 3 गडी बाद झाले होते. पण त्यानंतर मार्करम आणि डेविड मिलरने दमदार भागिदारी करत दक्षिण आफ्रिकेला विजयाजवळ नेलं. 19 व्या षटकात स्टब्सने महत्त्वपूर्ण चौकार ठोकला. ज्यानंतर अखेरच्य षटकात 6 चेंडूत 6 धावांची गरज असताना दक्षिण आफ्रिकेनं 2 चेंडू आणि 5 विकेट्स राखून सामना जिंकला. मार्करमने 52 तर मिलरने नाबाद 59 रन केले. सामनावीर म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एनगिडीला सन्मानित करण्यात आलं. त्यानं भारताचे सर्वात महत्त्वपूर्ण 4 विकेट्स घेतले.
हे देखील वाचा-