IND vs PAK Match Highlights : भारताचा पाकिस्तानवर 4 विकेट्सनी रोमहर्षक विजय, सामन्याचे सर्व हायलाईट्स एका क्लिकवर
IND vs PAK T20 World Cup 2022 LIVE :
LIVE
Background
IND vs PAK Match Live Update : क्रिकेट जगतामधील सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी म्हटलं की, भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan). या दोन्ही देशातील संबध फारसे ठीक नसल्याने दोघेही एकमेंकाचा दौरा करत नाहीत. त्यामुळे मोठ्या आयसीसी स्पर्धांमध्ये आमने-सामने येणारे दोघेही आता पुन्हा एकदा समोरसमोर येत आहे. आज दोघेही एकमेंकाशी भिडणार आहेत. दोन्ही संघाचा टी20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेतील हा पहिला सामना असेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीत कोणता संघ बाजी मारेल? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
नुकत्याच झालेल्या आशिया चषकातील (Asia Cup 2022) दोन सामन्यांपैकी एकामध्ये भारताने बाजी मारली तर एकामध्ये पाकिस्तान जिंकला, त्यानंतर आता पुन्हा दोघे आमने-सामने येत असून ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्नच्या (Melbourne Cricket Ground) मैदानात हा सामना रंगत आहे. टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) संघ यांच्यात आतापर्यंत 11 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 11 पैकी 8 सामन्यात विजय मिळवलाय. तर, पाकिस्तान संघाला 3 सामने जिंकता आले आहेत. तसंच सामना रंगणाऱ्या ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांचा विचार करता या स्टेडियमवर पहिल्या डावाची एकूण सरासरी 139 आहे तर दुसऱ्या डावाची एकूण सरासरी 127 आहे. स्टेडियमवर आतापर्यंत 18 T20 सामने झाले आहेत. स्टेडियमवर आतापर्यंतचा सर्वोच्च संघ 184-4 आहे. खेळपट्टी गोलंदाजांना चांगला बाऊन्स देत असल्याने वेगवान गोलंदाजांना अधिक फायदा होताना दिसतो. वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत स्पिनर्सना अधिक फायदा होत नाही.
कसे असू शकतात दोन्ही संघ?
भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.
पाकिस्तान: बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.
हे देखील वाचा -