एक्स्प्लोर

IND vs NED : पावसामुळं भारत-नेदरलँड सामना रद्द झाल्यास भारताच सेमीफायनलमध्ये पोहोचणं अवघड? वाचा संपूर्ण गणित

T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आज भारत आणि नेदरलँड यांच्यात आज सामना रंगणार आहे.पण या सामन्यावेळी 70 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

IND vs NED, T20 World cup 2022 : आज भारत आणि नेदरलँड (Ind vs Ned) दोन्ही संघ टी20 विश्वचषक स्पर्धेतील सुपर 12 फेरीचा सामना खेळणार आहेत. भारताने सलामीचा सामना पाकिस्तानविरुद्ध जिंकत गुणतालिकेत आघाडी घेतली आहे. ज्यामुळे आजचा सामना जिंकल्यास भारत आणखी आघाडी घेऊन सेमीफायनलमध्ये भारताचं पोहोचणं आणखी सोपं होईल. पण भारत-नेदरलँड सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारताचं सेमीफायनलमध्ये पोहोचणं अवघड होणार का हा प्रश्न क्रिकेट प्रेमींसमोर आहे. याचच उत्तर जाणून घेऊ...

तर भारत आणि नेदरलँड सामना ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणार असून त्याठिकाणी जवळपास 70 टक्के पाऊस पडण्याची शक्यता Weather.com ने दिली आहे. दरम्यान टी20 विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे जर भारत आणि नेदरलँड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला आणि सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना गुण वाटून दिले जातील. ज्यानंतर भारताच्या खात्यावर 3 गुण होतील. मग भारताला रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकावा लागेल, ज्यानंतरच भारत आपली आघाडी कायम ठेवेल,त्यात पाकिस्तान संघही चांगल्या फॉर्मात असल्याने त्यांनी भारतानंतर उर्वरीत संघावर विजय मिळवल्यास आजच्या अनिर्णीत सामन्यामुळे भारताला एक गुण कमीच राहिल आणि पाकिस्तान पुढे जाऊ शकतो. या सर्वामध्ये पुढे जाऊन नेट रनरेटही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्यात नेदरलँडचा संघ खास फॉर्मात नसल्याने भारताच्या विजयाच्या अपेक्षा आज अधिक आहेत, त्यामुळे पावसाने व्यत्यय आणता कामा नये, अशी प्रार्थना भारतीय क्रिकेटप्रेमी करत आहेत.

कसा आहे ग्रुप 2 चा पॉईंट टेबल?

POS TEAM PLD WIN LOST TIED N/R NET RR PTS
1 बांग्लादेश 1 1 0 0 0 +0.450 2  
2 भारत 1 1 0 0 0 +0.050 2  
3 दक्षिण आफ्रीका 1 0 0 0 1 - 1  
4 झिम्बाब्वे 1 0 0 0 1 - 1  
5 पाकिस्तान 1 0 1 0 0 -0.050 0  
6 नेदरलँड 1 0 1 0 0 -0.450 0  
 
हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jharkhand Election 2024 : मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
Exit poll: मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल
मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवारVinod Tawde PC : आरोपानंतर विनोद तावडेंच मतदान, सुप्रिया सुळे, राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Election 2024 : मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
Exit poll: मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल
मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
Suhas Kande vs Sameer Bhujbal : सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
Maharashtra Assembly Election Voting 2024: राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, मुंबईत किती टक्के मतदान?
राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, सर्वाधिक मतदान कुठे? मुंबईत किती टक्के मतदान?
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
Jayant Patil : भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Embed widget