एक्स्प्लोर

बीडमध्ये जीएसटी अधिकाऱ्याचा कारमध्ये आढळला मृतदेह, पोलिसांना सापडली चिठ्ठी, मृत्युचे कारण समोर

जीएसटी अधिकऱ्याच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोट आढळून आली, आता याच सुसाईड नोट आधारे संबंधिताची चौकशी केली जाणार आहे.

बीड : गेल्या वर्षभरात नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणास्तव चर्चेत असलेले बीड पुन्हा एकदा जीएसटी अधिकाऱ्याच्या मृत्यूने चर्चेत आलं आहे. काल एका जीएसटी अधिकाऱ्याचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये अज्ञातस्थळी संशयास्पद आढळून आल्यानं खळबळ उडाली होती. बीड (Beed) जवळील कपिलधारवाडी परिसरात राज्य कर अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह गाडीत आढळून आला, त्यानंतर सदर ठिकाणी पोलिसांकडून (Police) फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून पंचनामा करण्यात आला. पीएम रिपोर्ट नंतर जाधवर यांच्या मृत्यूचे कारण समोर येईल, मात्र घटनास्थळावर सुसाईड नोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून या अधिकाऱ्याने जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती आहे.  

जीएसटी अधिकऱ्याच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोट आढळून आली, आता याच सुसाईड नोट आधारे संबंधिताची चौकशी केली जाणार आहे. तत्पूर्वी, सदरील प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आता, उपलब्ध झालेल्या पुराव्यानुसार पुढील कारवाई बीड पोलिसांनी सुरू केली आहे, अशी माहिती बीडचे अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली. 

सचिन जाधवर मूळचे सोलापूर जिल्ह्यातील चुंब या गावचे रहिवाशी आहेत. मागील काही वर्षांत ते बीडच्या जीएसटी कार्यालयात सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी राहत्या घरातून बाहेर पडलेले सचिन जाधवर शनिवार पर्यंत घरी पोहोचले नव्हते. त्यामुळे त्यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे जाधवर यांचा शोध घेतला असता बीड जवळील कपिलधारवाडी परिसरात त्यांचा मृतदेहच गाडीत संशयास्पदरित्या आढळून आला. घातपाताचा संशय आल्याने पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकाराचा तपास सुरू केला. शवविच्छेदना, दरम्यान जाधवर यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळली आणि यात आत्महत्येचं कारण वरिष्ठाच्या त्रासाचे नमूद करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी एका अधिकाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. उपलब्ध झालेल्या पुराव्यानुसार पुढील कारवाई सुरू असल्याचं बीड पोलिसांनी सांगितले. 

घटनेच्या सखोल चौकशी मागणी

सचिन जाधवर 2012 च्या एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिले आले होते. सर्वांशी मनमिळावू असलेले जाधवर यांच्या मृत्यूचे गूढ संशयास्पद आहे. बंद कारमध्ये मडक्यात कोळसा आणि लाकूड जाळून धूर केल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास आलं. त्यामुळे या सर्व घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. आढळून आलेल्या सुसाईड नोट वरून सचिन जाधवर यांच्या मृत्यूचे कारण समोर येत आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या केलेल्या चौकशीत नेमकं काय समोर आलं. जाधवर यांच्या मृत्यू मागील ठोस कारण काय? असे अनेक प्रश्न बीड पोलिसांना सोडवायचे आहेत.

हेही वाचा

पुण्यातील दोन प्रमुख रस्ते सोमवारी दिवसभर बंद; पुणेकरांना पोलिसांनी सांगितला पर्यायी मार्ग

महत्त्वाच्या बातम्या

दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
Nagpur Couple Death Marathi News: दिवाळीसाठी आले, शिक्षक दाम्पत्याने जीवन संपवले; नागपुरमधील खळबळजनक घटना
दिवाळीसाठी आले, शिक्षक दाम्पत्याने जीवन संपवले; नागपुरमधील खळबळजनक घटना
Nagpur Fire Accident: दिवाळीच्या दिवशी राज्यभर आगींचा भडका! नागपूर शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे 43 ठिकाणी आग, TVS शोरूमच्या आगीत 45 दुचाकी जळून खाक
दिवाळीच्या दिवशी राज्यभर आगींचा भडका! नागपूर शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे 43 ठिकाणी आग, TVS शोरूमच्या आगीत 45 दुचाकी जळून खाक
Amravati Crime News: दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
Embed widget