एक्स्प्लोर

विश्वचषक विजेत्या इंग्लंडला 13 कोटी, उपविजेत्या पाकिस्तानला 6.5 कोटींचं बक्षीस, टीम इंडियाला किती?

T20 WC 2022 Prize Money: विश्वचषक उंचावणाऱ्या इंग्लंड संघाला 13 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे.

T20 WC 2022 Prize Money: विश्वचषक उंचावणाऱ्या इंग्लंड संघाला 13 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. तर उप विजेत्या पाकिस्तानला संघाला 6.5 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. मेलबर्न मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पाच विकेटने पराभव करत टी 20 विश्वचषकावर नाव कोरलं होतं. बेन स्टोक्स आणि सॅम करन यांच्या भन्नाट खेळीच्या बळावर इंग्लंडने दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. T20 World Cup 2022 संकेतस्थळावर टी 20 विश्वचषकात सामील झालेल्या संघाला मिळणाऱ्या बक्षीसाची माहिती देण्यात आली आहे.

T20 World Cup 2022 संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघाला 1.6 मिलियन डॉलर म्हणजेच 13.18 कोटी रुपये मिळणार आहेत. तर उपविजेत्या पाकिस्तान संघाला 6.59 कोटी रुपये मिळणार आहे. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या भारत आणि न्यूझीलंड संघालाही बक्षीस मिळणार आहे. रोहित शर्मा आणि केन विल्यमसन यांच्या संघाला प्रत्येकी 3.29 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. 

सुपर 12 स्टेजमधून बाहेर गेलेल्या आठ संघाला प्रत्येकी  70,000 डॉलर (57.65 लाख रुपये) मिळणार आहेत.  तसेच  सुपर 12 स्टेजमध्ये प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला  40,000 डॉलर (32.95 लाख रुपये) मिळणार आहेत. सुपर 12 स्टेजमध्ये 30 सामने झाले आहेत. त्याशिवाय पहिल्या राऊंडमध्ये प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला 40,000 डॉलर (32.95 लाख रुपये) मिळणार आहेत. पहिल्या फेरीत 12 सामने झाले आहेत.  

बक्षीसांची संपूर्ण यादी:

संघ बक्षीस भारतीय चलनानुसार
विजेता 1.6 मिलियन डॉलर जवळपास 13.18 कोटी
उप- विजेता 0.8 मिलियन डॉलर जवळपास 6.59 कोटी
सेमीफायनलमध्ये पराभूत झालेला संघ 0.4 मिलियन डॉलर जवळपास 3.29 कोटी
सुपर-12 मध्ये प्रत्येक सामना जिंकणारा संघ 40 हजार डॉलर जवळपास 33.95 लाख
सुपर-12 मधून बाहेर पडणारा प्रत्येक संघ 70 हजार डॉलर जवळपास 57.65 लाख
पहिल्या फेरीत प्रत्येक सामना जिंकणारा संघ 40 हजार डॉलर जवळपास 32.95 लाख
पहिल्या फेरीतून बाहेर पडलेला संघ 40 हजार डॉलर जवळपास 32.95 लाख

फायनल सामन्यात काय झालं?
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तानचा पाच विकेट्सनं पराभव  केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघानं निर्धारित 20 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 137 धावांपर्यंत मजल मारली होती.  शान मसूद (38) आणि बाबर आझम (32) यांचा अपवाद वगळता पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडकडून सॅम करनने भेदक मारा केला. सॅम करन याने 12 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. अदिल रशीद आणि ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत सॅम करनला चांगली साथ दिली. पाकिस्ताननं दिलेलं 138 धावांचं आव्हान इंग्लंड संघाने 19 व्या षटकात पार केलं. बेन स्टोक्स याने 52 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी इंग्लंडला विजय मिळवून दिला. त्याशिवाय कर्णधार जोस बटलर याने 26 धावांची खेळी केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget