देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत नाव घेतलेल्या शीतल गंभीर 125 मतांनी जिंकल्या; रिकाऊंटींगची मागणी
मुंबईतील वार्ड क्रमांक 190 मधून शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली पाटणकर विजयी झाल्या आहेत. येथील वार्डातून भाजपच्या उमेदवार शितल गंभीर पराभूत झाल्या आहेत.

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांचे (Election) निकाल हाती आले असून मुंबईसह राज्यातील जवळपास 25 महापालिकेत भाजप-महायुतीने बहुमताचा आकडा गाठला आहे. विशेष म्हणजे मुंबईनंतर सगळ्यांचं लक्ष लागलेल्या पुणे महापालिकेत भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला असून भाजपचाच (BJP) महापौर येथील महापालिकेत दिसून येईल. मात्र, मुंबईतील काही जागांवर भाजप महायुतीला धक्काही बसला आहे. त्यामध्ये, माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांचा पराभव झाला आहे. तर, दादरचा गड ठाकरेंनी राखला. मात्र, आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळीत एकनाथ शिंदेंचा एक उमेदवार विजयी झाला आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईतील सभेत नाव घेतलेल्या शितल गंभीर देसाई वॉर्ड 190 मधून अवघ्या 125 मतांनी विजयी झाल्या आहेत. मात्र, येथील ठाकरेंच्या उमेदवाराने रिकाऊंटींगची मागणी केली आहे.
मुंबईतील वार्ड क्रमांक 190 मधून शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली पाटणकर पराभूत झाल्या असून शीतल गंभीर अवघ्या 125 मतांनी विजयी झाल्याने वार्डात राडा सुरू झाला आहे. वैशाली पाटणकर यांनी पुनर्मोजणीची मागणी केली आहे. येथील वार्डातून भाजपच्या उमेदवार शीतल गंभीर आणि वैशाली पाटणकर यांच्यात थेट लढत होती. आदित्य ठाकरेंसाठी ही लढत प्रतिष्ठेची ठरली होती. कारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथील जाहीर सभेतून आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. आदित्य ठाकरेंवर टीका करताना, आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी माझी गरज नाही, त्यांच्यासाठी आमच्या उमेदवार शीतल गंभीर याच पुरेशा आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले होते.
भाजपच्या आक्रमक महिला उमेदवार
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेल्या टीकेला भाजपकडून शीतल गंभीर यांच्याकडून प्रत्त्युतर देण्यात येत होतं. शीतल गंभीर यांच्याकडून काँग्रेस-राष्ट्रवादीने गेल्या 70 वर्षात काय केलं, 2014 च्या अगोदरपासून राज्यात आणि देशात काँग्रेसचीच सत्ता होती. मात्र, तरीही गरिबांचा विकास का झाला नाही, असा सवाल गंभीर यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे, भाजपच्या आक्रमक महिला उमेदवार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. त्याच पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क येथील सभेतून मुख्यमंत्र्यांनी शितल गंभीर यांचं नाव घेऊन आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. आदित्य ठाकरेंनी दिलेल्या चॅलेंजला आमच्या शीतल गंभीर उत्तर देतील असे फडणवीसांनी म्हटले होते. मात्र, त्याच शीतल गंभीर वार्ड 190 मधून 125 मतांनी विजयी झाल्या आहेत. मात्र, येथे वैशाली पाटणकर यांनी रिकाऊंटींगची मागणी केल्याने नवा वाद उपस्थित झाला आहे.
हेही वाचा
वडील महापालिकेत शिपाई, पोरानं उधळला गुलाल; शिपायाचा लेक रेशीमबागेतून शिवसेनेचा नगरसेवक





















