ENG vs NZ : इंग्लंड 20 धावांनी विजयी, सामन्याचे सर्व हायलाईट्स एका क्लिकवर
ENG vs NZ : विश्वचषक स्पर्धेतील दोन बलाढ्य संघ न्यूझीलंड आणि इंग्लंड आज आमने-सामने असणार आहेत. दोघेही गाबा मैदानात एकमेंकाविरुद्ध भिडणार आहेत.
LIVE
Background
ENG vs NZ, T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेत आज ग्रुप 1 मधील दोन बलाढ्य संघ न्यूझीलंड आणि इंग्लंड (NZ vs ENG) आमने-सामने असणार आहेत. न्यूझीलंडने 3 पैकी 2 सामने जिंकले असून एक सामना अनिर्णीत राहिला असला तरी ते अव्वलस्थानी आहेत. तर इंग्लंड संघाने एक सामना जिंकला असून एक गमावल आहे, तर एक अनिर्णीत राहिल्याने चौथ्या स्थानी आहेत. दरम्यान आजचा सामना जिंकल्यास न्यूझीलंडची सेमीफायनलमधील जागा जवळपास निश्चित होईल. तर इंग्लंड जिंकल्यास ते सेमीफायनलच्या दिशेने एक यशस्वी पाऊल टाकतील.
कसे आहेत दोन्ही संघ?
न्यूझीलंडचा संघ
केन विल्यमसन (कर्णधार), टिम साउदी, ईश सोधी, मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, मार्टिन गुप्टिल, लॉकी फर्ग्युसन, डेवॉन कॉन्वे, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट, फिन ऍलन.
इंग्लंडचा संघ
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड, अॅलेक्स हेल्स.
राखीव खेळाडू : लियाम डॉसन, रिचर्ड ग्लीसन, टायमल मिल्स.
कधी, कुठे पाहाल सामना?
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) हा टी20 विश्वचषक सुपर 12 फेरीतील (Super 12 Matches) सामना आज अर्थात 1 नोव्हेंबर रोजी खेळवला जात असून भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 1.30 वाजता सामना सुरु होत आहे. आजचा हा इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघातील सामना ऑस्ट्रेलियाच्या गाबा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
श्रीलंकेचा अफगाणिस्तावर विजय
आज दिवसभरातील पहिला सामना याच ऑस्ट्रेलियाच्या गाबा मैदानात श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघामध्ये (SL vs AFG) पार पडला. अफगाणिस्तानने हा सामना गमावल्यामुळे टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेच्या सेमीफायनलच्या शर्यतीतून भारत बाहेर पडला आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा संघ 6 विकेट्सने पराभूत झाला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 8 गडी गमावून 144 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 19 व्या षटकात केवळ 4 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. श्रीलंकेकडून सर्वोत्तम गोलंदाजी करत तीन विकेट्स घेणाऱ्या वानिंदू हसरंगाला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आलं.
हे देखील वाचा-