एक्स्प्लोर

AUS vs IND: केएल राहुलची झुंजार खेळी, सूर्याची तडाखेबाजी; भारताचं ऑस्ट्रेलियासमोर 187 धावांचं लक्ष्य 

AUS vs IND, ICC Mens T20 World Cup Warm-up Matches: ब्रिस्बेनच्या गब्बा येथे सुरु असलेल्या सराव सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. दोन्ही संघानं टी-20 विश्वचषकाची तयारी कशी केलीय? हे  या सामन्यातून स्पष्ट होईल.

AUS vs IND, ICC Mens T20 World Cup Warm-up Matches: भारताचा सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) आणि सूर्याकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) झुंजार अर्धशतकाच्या जोरावर भारतानं ऑस्ट्रेलियासमोर 187 धावांचं लक्ष्य ठेवलं. ब्रिस्बेनच्या (Brisbane) गब्बा (Gabba) येथे सुरु असलेल्या सराव सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. दोन्ही संघानं टी-20 विश्वचषकाची तयारी कशी केलीय? हे  या सामन्यातून स्पष्ट होईल. भारताच्या पहिल्या सराव सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) मोहम्मद शामीला (Mohammed Shami) विश्रांती दिलीय. दरम्यान, वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel), भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) भारताच्या गोलंदाजीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतील.

ट्वीट-

केएल राहुल  (57 धावा) आणि रोहित शर्मा (15 धावा) या सलामीच्या जोडीनं भारताला झंझावाती सुरुवात करून दिली. पहिल्या सहा षटकात भारतानं एकही विकेट न गमावता 70 धावा केल्या. यादरम्यान राहुलनं अवघ्या 27  चेंडूत अर्धशतक झळकावलं. तर, रोहितच्या बॅटीतून काही खास शॉट्स पाहायला मिळाले. या सामन्यातील पावरप्लेमध्ये भारताचं पारडं जड दिसलं. मात्र, पुढच्या चार षटकांत ऑस्ट्रेलियाच्या संघानं पुनरागमन केलं.  ग्लेन मॅक्सवेल आणि अॅस्टन अगर यांनी अनुक्रमे केएल राहुल आणि रोहित शर्मा यांना बाद करून भारताला दोन धक्के दिले. भारतानं 10 षटकात दोन विकेट्स गमावून 89 धावा केल्या. पुढच्या पाच षटकात भारतानं 49 धावा लुटल्या. परंतु, विराट कोहली (19 धावा) आणि हार्दिक पांड्याची (2 धावा) विकेट्स गमावली. अखेरच्या पाच षटकात भारतानं 48 धावा केल्या. अशाप्रकारे भारतीय संघानं निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 186 धावा केल्या. यादरम्यान सूर्यकुमार यादवनं 32 चेंडूत अर्धशतक झळकावलं. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसननं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, मिचेश स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि अॅस्टर अगरच्या खात्यात प्रत्येकी एक-एक विकेट्स जमा झाली.

संघ-

भारताची प्लेईंग इलेव्हन: 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर अश्विन, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह.

ऑस्ट्रेलियाची प्लेईंग इलेव्हन:
आरोन फिंच (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, जोश इंग्लिश, टीम डेव्हिड, अॅस्टन अगर, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, केन रिचर्डसन.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवटMVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Embed widget