(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ENG vs NZ live updates : वर्ल्डकप महासंग्राम सुरु; इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
न्यूझीलंडचा संघ दोनवेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला असला तरी चॅम्पियन होऊ शकलेला नाही. दुसरीकडे, इंग्लंड एकदिवसीय तसेच टी-20 मध्ये विश्वविजेता आहे. त्यामुळे इंग्लंडचे पारडे जड असेल.
LIVE
Background
World cup 2023 : आयसीसीच्या वन डे विश्वचषकाला आजपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. गतविजेत्या इंग्लंड (England) आणि गतवेळच्या उपविजेत्या न्यूझीलंड (New Zealand) संघांमधल्या सामन्यानं या विश्वचषकाची लढाई सुरु झाली. न्यूझीलंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
न्यूझीलंडचा इंग्लंडवर नऊ विकेटने विजय
न्यूझीलंडचा इंग्लंडवर नऊ विकेटने विजय... सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडची बाजी
न्यूझीलंडच्या 250 धावा
न्यूझीलंडने 250 धावांचा टप्पा पार केला आहे. कॉन्वे आणि रचित शतकी खेळी केली.
विजय न्यूझीलंडच्या दृष्टीक्षेपात
इंग्लंडने दिलेल्या 283 धावांचा सामना करताना न्यूझीलंड संघाने दमदार फलंदाजी केली. आधी गोलंदाजांनी रोखले, त्यानंतर फलंदाजांनी चोपले. न्यूझीलंडला विजयासाठी 96 चेंडूत 38 धावांची गरज आहे. न्यूझीलंडच्या हातात नऊ विकेट आहेत.
कॉन्वेनंतर रचित रविंद्र याचे शतक
कॉनवे याने विश्वचषकात शतक ठोकले. रविंद्र याचे विश्वचषकातील पहिले शतक होय. रविंद्र याने अवघ्या 82 चेंडूचा सामना करत शतक ठोकलेय.
डेवॉन कॉनवेची शतकी खेळी
सलामीच्याच सामन्यात डेवेन कॉनवे याने शतक ठोकले आहे. कॉनवेने 83 चेंडूत शतक ठोकले..