एक्स्प्लोर
कोच निवडीबाबत विराट कोहली म्हणतो...
अँटिगा: अनिल कुंबळेनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नव्या कोचचा पुन्हा एकदा शोध सुरु झाला आहे. कर्णधाराला माझी प्रशिक्षणाची पद्धत आवडत नसल्याचं अनिल कुंबळेनं आपल्या राजीनाम्यात म्हटलं होतं. त्यानंतर बऱ्याच जणांनी कोहलीला लक्ष्य केलं होतं. दरम्यान आता विराट कोहलीनं नव्या कोचच्या निवडीबाबत वक्तव्य केलं आहे.
सध्या रवी शास्त्री हे प्रशिक्षकपदाच्या रेसमध्ये आघाडीवर आहे. कोहली देखील रवी शास्त्रीच्या जवळचा असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे कोहली शास्त्रींच्या पारड्यात वजन टाकण्याची शक्यता आहे.
कोहलीला जेव्हा नव्या कोचबाबत त्याचं मत विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला की, 'वैयक्तिक मी काहीही सांगू शकत नाही. पण एक टीम म्हणून आम्हाला बीसीसीआय याबाबत विचारणा करेल त्यावेळी आम्ही आमचं मत त्यांच्यासमोर मांडू.' कोहलीनं यावेळी मान्य केलं की, कोच निवडीसाठी स्वत:ची अशी एक प्रक्रिया असते त्यामुळे यात वैयक्तिक मत फारसं महत्वाचं नसतं.
विराट म्हणाला की, 'ही एक प्रक्रिया आहे ज्यामधून आम्ही नेहमीच जात असतो आणि टीम म्हणून आम्ही त्याचा सन्मानही करतो. आम्ही आमच्या काही सूचना असल्यास बीसीसीआयला देऊ पण सार्वजनिकरित्या काहीही बोलण्यात अर्थ नाही. त्यामुळे याबाबत जेव्हा आम्हाला विचारणा होईल. तेव्हा एक टीम म्हणून आम्ही बीसीसीआयसमोर आमचं मत मांडू.' असंही कोहली म्हणाला.
'सध्या आपलं लक्ष हे फक्त वेस्टइंडिज विरुद्धची मालिका जिंकण्यावर असणार आहे. सध्या कोच निवडीची प्रक्रिया सुरु असून त्यावर बीसीसीआयचं नियंत्रण आहे. त्यामुळे आम्ही इतर कोणत्याही गोष्टीवर लक्ष देत नाही. आगामी सामन्यांसाठी तयारी करणं आणि ही मालिका जिंकणं यालाच आमचं प्राधान्य आहे.' असं मत कोहलीनं व्यक्त केलं.
संबंधित बातम्या:
पुन्हा कोच होणार का, गॅरी कर्स्टन म्हणतात...
कुंबळे-कोहली वादावर गांगुलीची पहिल्यांदाच प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement