एक्स्प्लोर
मृत्यू जवळून पाहिला, मग त्रिशतकाचं ओझं कसलं: करुण नायर
चेन्नई: 'जर मृत्यू एवढ्या जवळून पाहिला असेल तर त्याच्यासाठी त्रिशतकाचं ओझं फार नसेल.' अशा शब्दात करुण नायरनं त्रिशतक ठोकल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली.
इंग्लंडविरुद्ध पाचव्या आणि मालिकेतील शेवटच्या कसोटीत करुण नायरनं 303 धावांची विक्रमी खेळी केली. पहिल्याच शतकाचं त्रिशतकात रुपांतर करणारा करुण हा पहिलाच भारतीय ठरला आहे.
करुणनं या खेळीविषयी बोलताना सुरुवातीला एका अशा घटनेविषयी सांगितलं की, ज्यानं सर्वांच्याच अंगावर अक्षरश: शहारे उभे राहिले. या वर्षी जुलै महिन्यात केरळमध्ये झालेल्या एका दुर्घटनेत करुण नायर अगदी थोडक्यात बचावला होता.
केरळमध्ये एका कार्यक्रमात मंदिरात जात असताना एक बोट अचानक पम्पा नदीत उलटली होती. या बोटीत तब्बल १०० लोक होतं. ज्यामध्ये त्रिशतकवीर करुण नायर हा देखील होता. करुणाला पोहता येत नव्हतं. पण त्यावेळी तिथं उपस्थित असणाऱ्या सुरक्षारक्षकांनी करुणसह अनेकांना बचावलं होतं.
याच घटनेविषयी बोलताना करुणनं अधिकृत प्रसारणकर्त्यांना सांगितलं की, 'मला माहित नव्हतं की, कसं पोहतात. तिथं असणाऱ्या लोकांनी मला वाचवलं. मी भाग्यवान होतो म्हणून मी वाचलो.' करुण मुळचा केरळमधील आहे. जुलैमध्ये एका मंदिरातील कार्यक्रमासाठी तो तिथं गेला होता. त्यावेळी त्याची बोट पलटी झाली होती.
'माझ्या आयुष्यातील ज्या खेळी खेळलो त्यातील माझी ही सर्वोत्कृष्ट खेळी होती. खेळपट्टीवर अनेकदा वेगवेगळी परिस्थिती होती. ज्यामुळे मला लोकेश, अश्विन आणि जडेजासोबत वेगवेगळ्या पद्धतीनं खेळावं लागलं. मला त्यांचे आभार मानायलाच हवे. कारण की, त्यांनी मला चांगलं सहकार्य केलं.' असं करुण म्हणाला.
कर्नाटकच्या या युवा खेळाडूनं म्हटलं की, 'पहिलं शतक नेहमीच अविस्मरणीय असतं. जेव्हा मी शतक ठोकलं. त्यानंतर मी स्वत:वर कोणताच दबाव जाणवू दिला नाही. मी माझे फटके खेळत गेलो आणि त्रिशतकही झळकलं.'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement