एक्स्प्लोर

Ind Vs NZ उपान्त्य फेरीवर पावसाचं वर्चस्व राहिल्यास सामन्यावर काय परिणाम?

पावसात हा सामना पूर्णपणे धुवून निघाला, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी तो खेळवला जाईल. त्यासाठीच उपान्त्य फेरीमधील दोन सामन्यांमध्ये राखीव दिवस ठेवण्यात आलेला आहे.

मुंबई : टीम इंडियाने विश्वचषकाच्या साखळी फेरीत सर्वोत्तम कामगिरी बजावून गुणतालिकेत अव्वल क्रमांक पटकावला. आता उपान्त्य फेरीत टीम इंडियाचा सामना उद्या (मंगळवारी) न्यूझीलंडशी होणार आहे. मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यावर पावसाचं सावट आहे. या सामन्यात जर पावसाचा खेळ झाला, तर निकालावर काय परिणाम होईल, हा प्रश्न काही जणांना पडला आहे. भारताचे बिनीचे फलंदाज आणि न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजामधलं द्वंद्व हे या सामन्याचं मुख्य आकर्षण ठरण्याची शक्यता आहे. भारताला रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल या तीन फलंदाजांकडून पुन्हा धावांची अपेक्षा राहील, तर न्यूझीलंडची मदार लॉकी फर्ग्युसन, ट्रेण्ट बोल्ट आणि मॅट हेन्री या तीन वेगवान गोलंदाजांवर राहील. मात्र या सामन्यात पावसाचं वर्चस्व राहिलं, तर काय होईल? पावसात हा सामना पूर्णपणे धुवून निघाला, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी तो खेळवला जाईल. त्यासाठीच उपान्त्य फेरीमधील दोन सामन्यांमध्ये राखीव दिवस ठेवण्यात आलेला आहे. इंग्लंडमधील स्थानिक हवामान विभागाच्या अनुमानानुसार बुधवारच्या दिवसावरही पावसाचं सावट आहे. जर त्या दिवशीही पाऊस पडला, तर भारत थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. कारण गुणतालिकेत भारताला न्यूझीलंडपेक्षा अधिक गुण आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधला दुसरा उपान्त्य सामना गुरुवारी खेळवला जाणार आहे. त्यानंतर, रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीपूर्वीही मध्ये दोन दिवसांची वेळ राखून ठेवण्यात आली आहे. साखळी फेरीमध्ये सामन्यादरम्यान पाऊस पडल्यास दोन्ही संघांना एक-एक गुण बहाल केले जात होते. मात्र उपान्त्य फेरीत राखीव दिवसाचा पर्याय आहे. सामना सुरु झाल्यानंतर पावसाला झाली, किंवा ठराविक वेळेत पाऊस थांबला, तर डकवर्थ ल्युईस पद्धती लागू होईल. त्यानुसार एका किंवा दोन्ही संघांना 50 षटकं फलंदाजीसाठी दिली जाणार नाहीत. विशेष म्हणजे साखळी फेरीतील भारत आणि न्यूझीलंड यांच्या सामन्यातच पाऊस झाला होता. त्यामुळे दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आले होते. म्हणूनच हे दोन संघ भिडल्यावर कोणाचं वर्चस्व राहील, याबाबत केवळ कागदी ठोकताळे बांधले जात आहेत. नऊ सामन्यांमध्ये 15 गुण मिळवत भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द होऊन भारताला एकच गुण मिळाला, तर इंग्लंडकडून पराभवाचा धक्का बसल्याने भारताचे दोन गुण गेले होते. ऑस्ट्रेलियाने भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांकडून पराभव स्वीकारत 14 गुणांची कमाई केली आणि दुसरं स्थान पटकावलं. तीन सामन्यात पराभूत झालेला इंग्लंड 12 गुणांसह तिसऱ्या, तर न्यूझीलंड 11 गुणांसह चौथ्या स्थानी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL News : हार्दिक पांड्याची चर्चा, पण गेम भलताच! IPL चा सर्वात मोठा सायलेंट ऑपरेटर आता मुंबईत; पलटनची मोठी घोषणा
हार्दिक पांड्याची चर्चा, पण गेम भलताच! IPL चा सर्वात मोठा सायलेंट ऑपरेटर आता मुंबईत; पलटनची मोठी घोषणा
AUS vs BAN 2nd Test : 229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
AUS vs BAN 2nd Test : स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
Mitchell Starc : 22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO
22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
Embed widget