एक्स्प्लोर
Advertisement
तब्बल नऊ वेळा रणजी करंडक विजेत्या संघात, वसिम जाफरचा विक्रम
1997 साली जाफरने पहिल्यांदा मुंबईकडून रणजी स्पर्धेची फायनल खेळली होती.
इंदूर : यंदाच्या रणजी विजेत्या विदर्भ संघातील अनुभवी खेळाडू आणि भारताचा कसोटीवीर वासिम जाफरने एका अनोख्या विक्रमाची नोंद केली. जाफरची रणजी स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळण्याची ही नववी वेळ होती. विशेष म्हणजे नऊही वेळा जाफरच्या संघाने विजेतेपद पटकावलं.
1997 साली जाफरने पहिल्यांदा मुंबईकडून रणजी स्पर्धेची फायनल खेळली होती. त्याने 18 वर्ष मुंबईचं रणजी संघाचं प्रतिनिधीत्व केलं. यादरम्यान मुंबईने आठ वेळा रणजी करंडक आपल्या नावावर केला. त्यानंतर 2015-16 या मोसमात जाफर विदर्भ संघात दाखल झाला.
39 वर्षाच्या वासिम जाफरनं आतापर्यंत 138 रणजी सामन्यात 36 शतकांसह 10 हजार 738 धावांचा रतीब घातला आहे.
विदर्भाची बलाढ्य दिल्लीवर 9 विकेट्स राखून मात
इंदूरच्या होळकर स्टेडियमवर फैज फजलच्या विदर्भाने आज इतिहास रचला. बलाढ्य दिल्लीला नऊ विकेट्सने पराभूत करत विदर्भाने पहिल्यांदाच रणजी चषकावर आपलं नाव कोरलं. अक्षय वाखरे आणि आदित्य सरवटेच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विदर्भाने दिल्लीचा दुसरा डाव 280 धावांत गुंडाळला.
दिल्लीकडून मिळालेलं 29 धावांचं सोपं लक्ष्य विदर्भाने एका विकेटच्या बदल्यात पार केलं. विदर्भाकडून दुसऱ्या डावात अक्षय वाखरेने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर आदित्य सरवटेने तीन फलंदाजांना माघारी धाडलं. रजनीश गुरबानीने दोन तर आदित्य सरवटे आणि सिद्धेश नेरळने प्रत्येकी एक विकेट घेतली.
रणजी करंडकाच्या 84 वर्षांच्या इतिहासात विदर्भाने रणजी करंडक जिंकण्याची ही वेळ आहे. विदर्भाला आजवरच्या इतिहासात 1970-71 आणि 1995-96 या दोन मोसमात रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारता आली होती. पण यंदा फैज फझलच्या नेतृत्वाखालील विदर्भाच्या संघाने अंतिम सामन्यात धडक मारत आपली सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे.
संबंधित बातमी : विदर्भाने इतिहास रचला, पहिल्यांदाच रणजी करंडकाचा मान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement