एक्स्प्लोर
विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा आणखी एक रेकॉर्ड मोडला
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार, रनमशिन विराट कोहली वेस्ट इंडीज विरोधात तडाखेबाज कामगिरी बजावत आहे. तुफान फटकेबाजी करतानाच कोहलीने विक्रमवीर सचिन तेंडुलकरचा आणखी एक रेकॉर्ड मोडित काढला आहे. 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना (चेसिंग) सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम आता विराटच्या नावे जमा झाला आहे.
जानेवारी 2017 मध्ये विराटने यशस्वी चेसिंगमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा सचिनचा विक्रम मोडला होता. त्यानंतर गुरुवारी वेस्ट इंडीज विरुद्ध झालेल्या वन डे सामन्यात कोहलीने चेसिंगमधील सर्वाधिक सेंच्युरी करण्याचा मान मिळवला.
सचिन तेंडुलकरने चेसिंग करताना 232 इनिंग्जमध्ये 17 शतकं ठोकण्याचा विक्रम रचला होता. विराटने मात्र अवघ्या 102 डावांमध्ये 18 शतकं ठोकण्याची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे सचिन दुसऱ्या स्थानावर गेला आहे, तर 116 इनिंग्जमध्ये 11 शतकं करणारा श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान तिसऱ्या क्रमांकावर आहे.
वेस्ट इंडिजमध्ये यजमानांविरोधात दोन शतकं झळकवणारा विराट कोहली एकमेव भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी राहुल द्रविड हा एक शतक ठोकणारा एकमेव भारतीय कॅप्टन होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement