एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
U19WC : उपांत्य फेरीत टीम इंडिया पाकिस्तानला भिडणार
न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकाचा हा सामना ख्राईस्टचर्चमध्ये खेळवण्यात येईल.
वेलिंग्टन : अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल. मंगळवारी भल्या पहाटे हा सामना रंगणार आहे. पृथ्वी शॉच्या भारतीय संघानं बांगलादेशचा 131 धावांनी धुव्वा उडवून अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकाचा हा सामना ख्राईस्टचर्चमध्ये खेळवण्यात येईल. 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या इतिहासात भारतानं तीनवेळा, तर पाकिस्ताननं दोनवेळा विजेतेपदाचा मान मिळवला आहे. भारत आणि पाकिस्तान संघांची सध्याची ताकद लक्षात घेता उभय संघांमधला उपांत्य सामना अतिशय चुरशीचा होईल, असा अंदाज आहे.
U19WC : भारताची विजयी घोडदौड, बांगलादेशवर 131 धावांनी मात
यंदाच्या विश्वचषकात भारतानं उपांत्य फेरीआधी सलग चार सामने जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. पाकिस्तानला सलामीच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानकडून हार स्वीकारावी लागली होती. पण ओळीनं तीन सामने जिंकून पाकिस्ताननं उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. संबंधित बातम्या U19 world cup: भारत उपांत्य फेरीत, झिम्बाब्वेवर मोठा विजय आयसीसीचा वन डे आणि कसोटी संघ, कोहली दोन्ही संघाचा कर्णधार U19 world cup: पीएनजीला 64 धावात गुंडाळलं, भारताचा मोठा विजय पृथ्वी शॉची फलंदाजी पाहून दिग्गजांना सचिन आठवला 146.8 च्या वेगाने गोलंदाजी, अंडर-19 विश्वचषकात नागरकोटीचा विक्रमअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
क्रीडा
निवडणूक
Advertisement