(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hockey World Cup 2023: हॉकी विश्वचषकात 'हे' पाच खेळाडू भारताला जिंकवू शकतात ट्रॉफी, दमदार आहे रेकॉर्ड
Hockey World Cup 2023: ओडिशामध्ये 13 जानेवारीपासून पुरुष हॉकी विश्वचषकाची सुरुवात होणार आहे, यंदा भारतीय संघ विजयाचा दावेदार मानला जात आहे. .
Hockey World Cup 2023: हॉकी विश्वचषक 2023 (Hockey World Cup 2023) शुक्रवार, 13 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यावेळी ओडिशामध्ये विश्वचषक खेळवला जाणार आहे. घरच्या मैदानावर होणाऱ्या या विश्वचषकात टीम इंडियाला पुन्हा एकदा चॅम्पियन बनण्याची संधी आहे. भारतीय संघाने यापूर्वी 1975 मध्ये विश्वचषक जिंकला होता. यावेळी टीम इंडिया (Team India) ही दीर्घ प्रतीक्षा संपवू शकते. तर संघातील पुढील पाच खेळाडू यावेळी संघाला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाचे योगदान देऊ शकतात. चला जाणून घेऊया कोण आहेत टीमचे हे पाच खास खेळाडू...
1 आकाशदीप सिंग
टीमचा स्टार खेळाडू आकाशदीप सिंगने 2012 मध्ये भारताकडून पदार्पण केले होते. आकाश हा अनुभवी खेळाडू आहे. त्याने 200 हून अधिक सामने खेळले आहेत. आकाशने 80 हून अधिक गोल केले आहेत. त्याला गोल मशीन असंही म्हणतात. आकाशदीप यंदा तिसरा विश्वचषक खेळणार आहे.
2 कॅप्टन हरमनप्रीत सिंग
संघाचा स्टार डिफेंडर हरमनप्रीत कौर यावेळी संघाचे नेतृत्व करेल. याआधी तो 2018 चा विश्वचषकही खेळला होता, पण यावेळी कर्णधार म्हणून त्याच्यावर अधिक दबाव असेल. हरमनप्रीत कौरने आपल्या कारकिर्दीत ज्युनियर वर्ल्ड कप आणि आशिया कप सारख्या स्पर्धा जिंकल्या आहेत.
3 मनप्रीत सिंग
गेल्या विश्वचषकात संघाचा कर्णधार असणारा मनप्रीत सिंग यावेळी सामान्य खेळाडूप्रमाणे संघात सामील होणार आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक संघाला मिळवून दिले होते. मनप्रीत सिंग या विश्वचषकात कर्णधार नसला तरी संघासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो.
4 मनदीप सिंग
मनदीप सिंगची संघातील एक खास खेळाडू आहे. विरोधी संघाला चकवण्यात आणि पेनल्टी कॉर्नर घेण्यात मनदीप सिंग चांगलाच माहिर आहे. 2022 मध्ये तो संघासाठी सर्वाधिक गोल करणारा दुसरा खेळाडू होता. त्याने एकूण 13 गोल केले.
5 गोलरक्षक पीआर श्रीजेश
पीआर श्रीजेश हा संघाचा अनुभवी गोलरक्षक आहे. पीआर श्रीजेश यावेळी तिसरा विश्वचषक खेळणार आहे. त्याचा हा अनुभव संघासाठी खूप प्रभावी ठरू शकतो.
हे देखील वाचा-