एक्स्प्लोर
Advertisement
राहुल द्रविडचा 'आयसीसी हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश
याआधी भारताच्या बिशनसिंग बेदी, कपिल देव, सुनील गावस्कर आणि अनिल कुंबळे यांना 'आयसीसीच्या हॉल ऑफ फेम'मध्ये स्थान मिळालं आहे.
मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि 'द वॉल' अशी ख्याती असलेला क्रिकेटपटू राहुल द्रविडचा 'आयसीसीच्या हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश करण्यात आला आहे. आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारा द्रविड हा भारताचा पाचवा खेळाडू ठरला आहे.
द्रविडला भारत आणि विंडीजमधली पाचवी वन डे सुरु होण्याआधी दिग्गज क्रिकेटपूट सुनील गावस्कर यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आलं. द्रविडच्या खात्यात आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 24 हजार 208 धावा जमा आहेत.
याआधी भारताच्या बिशनसिंग बेदी, कपिल देव, सुनील गावस्कर आणि अनिल कुंबळे यांना 'आयसीसीच्या हॉल ऑफ फेम'मध्ये स्थान मिळालं आहे. राहुल द्रविडला 2 जुलै रोजी हा सन्मान जाहीर झाला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर हा सन्मान मिळवण्यासाठी पाच वर्षांनी एखादा क्रिकेटपटू पात्र ठरतो. भारतासाठी 164 कसोटी आणि 344 वनडे सामने खेळल्यानंतर द्रविडने 2012 मध्ये निवृत्तीची घोषणा केली होती.
कसोटी क्रिकेटमध्ये द्रविडने 36 शतकं ठोकून 13 हजार 288 धावा केल्या होत्या. तर वनडेमध्ये त्याने 12 शतकं झळकावत 10 हजार 889 धावा ठोकल्या.
Rahul Dravid becomes the 5th Indian to be inducted in the @ICC Hall of Fame. Congratulations to the legend on joining a list of all-time greats across generations. pic.twitter.com/RAyQ8KrtWR
— BCCI (@BCCI) November 1, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement