एक्स्प्लोर
Advertisement
मालिका विजयानंतर विराटचं द. आफ्रिकेला 'अखेरचं आव्हान'
टीम इंडियाने या विजयासह सहा सामन्यांच्या मालिकेत 4-1 अशी विजयी आघाडी घेतली.
पोर्ट एलिझाबेथ : विराट कोहलीच्या टीम इंडियाने पोर्ट एलिझाबेथची पाचवी वन डे जिंकून दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पहिल्यांदाच वन डे सामन्यांची मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला. भारताने दक्षिण आफ्रिकेला 201 धावांत गुंडाळून, पाचव्या वन डेत 73 धावांनी विजय साजरा केला. टीम इंडियाने या विजयासह सहा सामन्यांच्या मालिकेत 4-1 अशी विजयी आघाडी घेतली.
या मालिकेतील अखेरचा आणि सहावा वन डे सामना 16 फेब्रुवारी सेन्चुरियनमध्ये खेळवला जाणार आहे. केवळ औपचारिकता म्हणून उरलेल्या या सामन्यात विजयाच्या इराद्याने मैदानात उतरु, असं कर्णधार विराट कोहलीने अगोदरच स्पष्ट केलं आहे.
''या मालिका विजयानंतर आता खेळात आणखी कुठे सुधारणा करता येईल,'' याबाबत विचार करु असं विराटने सांगितलं.
''सध्या मालिकेत 4-1 ने आघाडी आहे. मात्र 5-1 ने आघाडीवर राहण्याची इच्छा आहे. सद्यपरिस्थिती पाहता पुढील सामन्यात आणखी काही खेळाडूंना संधी मिळू शकते,'' अशी रणनितीही विराटने सांगितली.
''जिंकणं हीच आमची प्राथमिकता आहे आणि जिंकण्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत,'' असंही विराटने स्पष्ट केलं.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत फिरकीपटू जोडी यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी मोलाची भूमिका निभावली आहे. मात्र मालिका विजय ही संघाची कामगिरी आहे, असंही सांगायला विराट विसरला नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement