एक्स्प्लोर

Rohit Sharma Team India : मोठी बातमी: रोहित शर्माचं वनडेतील कर्णधारपद जाणार, शुभमन पर्वाचा आरंभ, विराट कोहलीचं काय?

BCCI to remove Rohit Sharma as ODI captain : टीम इंडियाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या रोहित शर्मा याला आता कर्णधारपदावरुन पायउतार व्हावे लागणार आहे.

India squad Australia Tour : गेल्या अनेक वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे यशस्वीपणे नेतृत्त्व करणारा आणि टीम इंडियाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या रोहित शर्मा याला आता कर्णधारपदावरुन पायउतार व्हावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा पुन्हा एकदा भारतीय संघात समावेश होणार आहे. मात्र, रोहित शर्मा याला कर्णधारपद सोडावे लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच्याऐवजी शुभमन गिल याच्याकडे संघाची धुरा सोपवली जाईल. त्यामुळे कसोटी क्रिकेटप्रमाणे आता एकदिवसीय फॉर्मेटमध्येही शुभमन पर्वाचा आरंभ होणार आहे.

रोहित आणि विराट खेळाडू म्हणून खेळणार?

इंडियन एक्सप्रेसनुसार, रोहित शर्मा आणि विराट कोहली एकदिवसीय संघाचा भाग असतील, परंतु कर्णधारपद गिलकडे जाऊ शकते. हे भारतीय क्रिकेटविश्वातील मोठे स्थित्यंतर ठरणार आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना स्थान मिळणार आहे. आतापर्यंत हे दोन्ही खेळाडू संघाचा आधारस्तंभ होते. मात्र, आता त्यांना एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

या दोघांना शुभमन गिलच्या नेतृत्त्वाखाली आणि युवा खेळाडुंचा भरणा असलेल्या भारतीय संघात खेळावे लागणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द आता अस्ताकडे चालली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियावरुद्धची एकदिवसीय मालिका कदाचित त्यांची शेवटची संधी असू शकते. या शेवटच्या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे संस्मरणीय कामगिरी करुन आपल्या कारकीर्दीचा गोड शेवट करतील, अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांना आहे. 

ही मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार

2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत ते खेळू शकतील की नाही हे त्यांच्या परतीच्या फॉर्मवर अवलंबून असेल. भारतीय संघ 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेला सुरुवात करेल. दुसरा एकदिवसीय सामना 23 ऑक्टोबर रोजी आणि तिसरा सामना 25 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. त्यानंतर 29 ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू होईल.
 
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक (India Australia Tour Schedule)

वनडे मालिकेचं वेळापत्रक

19 ऑक्टोबर - पहिली वनडे (पर्थ)
23 ऑक्टोबर- दुसरी वनडे (एडिलेड)
25 ऑक्टोबर- तिसरी वनडे (सिडनी)

पाच सामन्यांची टी 20 मालिका

29 ऑक्टोबर - पहिली टी20 (कॅनबेरा)
31 ऑक्टोबर - दुसरी टी20 (मेलबर्न)
2 नोव्हेंबर - तिसरी टी20 (होबार्ट)
6 नोव्हेंबर - चौथी टी20 (गोल्ड कोस्ट)
8 नोव्हेंबर - पाचवी टी20 (ब्रिसबेन)

हे ही वाचा -

Ind beat Wi 1st Test : टीम इंडियाने फक्त तीन दिवसांत वेस्ट इंडिजचा फडशा पाडला, अहमदाबाद कसोटीत भारताचा मोठा विजय, WTC क्रमवारीत काय बदल?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
Dhananjay Munde: आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
Embed widget