Team India Schedule in 2024 : सहा महिन्यांवर टी-20 वर्ल्डकप ते तब्बल 15 कसोटी; टीम इंडियाला नव्या वर्षात चांगलाच घाम फुटणार!
Team India Schedule in 2024 : भारतीय संघ नवीन वर्षात म्हणजे 2024 मध्ये किती आंतरराष्ट्रीय सामने खेळणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नक्कीच उत्सुकता असेल? तर भारतीय संघाला 15 कसोटी सामने खेळायचे आहेत.
Team India Schedule in 2024 : जगभरातील लोकांनी जल्लोषात 2023 ला निरोप दिला आणि 2024 चे भव्य पद्धतीने स्वागत केले. सर्वांच्या चेहऱ्यावर नवीन वर्षाचा आनंद असेल. भारतीय क्रिकेट संघानेही नवीन वर्षाचा प्रवास सुरू केला आहे. भारतीय क्रिकेट संघासाठी 2023 वर्ष वेगळे आणि संमिश्र भावनांचे होते. भारतीय संघाने 2023 वर्षाची सुरुवात विजयाने केली. पण शेवटी तसे करता आले नाही. भारतीय संघाने 2023 ची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध मायदेशातील मालिकेने केली. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात आली.
भारतीय संघाला नवीन वर्षाची सुरुवात विजयाने करावी लागेल
भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना जिंकून विजयाने नवीन वर्षाची सुरुवात केली. यानंतर, तिसरा सामना जिंकून हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मालिका 2-1 अशी खिशात घातली. मात्र, भारतीय संघाला 2023 वर्षाचा शेवट विजयाने करता आला नाही. भारतीय संघाने 2023 चा शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. या कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला एक डाव आणि 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आता 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना 3 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला नव्या वर्षाची सुरुवात दणदणीत विजयाने करायची आहे.
Schedule of Indian team in 2024. [Men's]
— Johns. (@CricCrazyJohns) December 31, 2023
- 1 Test vs SA in SA.
- 3 T20I vs AFG in IND
- 5 Test vs ENG in IND.
- T20 World Cup.
- 3 T20I & 3 ODI vs SL in SL.
- 2 Test & 3 T20I vs BAN in IND.
- 3 Test vs NZ in IND
- 4 Test vs AUS in AUS. pic.twitter.com/OvwdIYjHrB
भारतीय संघ असे 15 कसोटी सामने खेळणार
भारतीय संघ नवीन वर्षात म्हणजे 2024 मध्ये किती आंतरराष्ट्रीय सामने खेळणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नक्कीच उत्सुकता असेल? संघाचे वेळापत्रक कसे असेल? भारतीय संघाला 15 कसोटी सामने खेळायचे आहेत. यानंतर एकूण 18 टी-20 सामने (विश्वचषक फायनल खेळल्यानंतर) खेळले जाणार आहेत. तर केवळ 3 वनडे सामने होणार आहेत. 2024 च्या शेवटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्याचा एक सामना पुढील वर्षी 3 जानेवारी 2025 पासून खेळवला जाऊ शकतो. अशाप्रकारे भारतीय संघ 2024 मध्ये एकूण 15 कसोटी खेळू शकतो. यामध्ये इंग्लंडविरुद्ध 5, बांगलादेशविरुद्ध 2 आणि न्यूझीलंडविरुद्ध 3 कसोटी खेळल्या जाणार आहेत.
India will be playing 10 Tests at home in 2024:
— Johns. (@CricCrazyJohns) January 1, 2024
- 5 v England.
- 2 v Bangladesh.
- 3 v New Zealand. pic.twitter.com/IZMKHkjTUR
टी-20 विश्वचषकही जूनमध्ये खेळवला जाणार
2024 मध्ये भारतीय संघ फक्त 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध मायदेशात ही मालिका होणार आहे. तर अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशविरुद्ध 3-3 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. दरम्यान, भारतीय संघाला जूनमध्ये होणारा टी-20 विश्वचषकही खेळायचा आहे. यामध्ये जर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तर तो एकूण 9 सामने खेळू शकतो. अशा परिस्थितीत हा संघ 2024 मध्ये एकूण 18 टी-20 सामने खेळू शकतो.
टीम इंडियाचे 2024 चे संपूर्ण वेळापत्रक
- 3 ते 7 जानेवारी : विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुसरा कसोटी सामना, केपटाऊन
- 11 ते 17 जानेवारी : विरुद्ध अफगाणिस्तान, 3 सामन्यांची T20 मालिका, (मायदेशात)
- 25 जानेवारी ते 11 मार्च : विरुद्ध इंग्लंड, 5 कसोटी सामन्यांची मालिका, (मायदेशात)
- आयपीएल 2024 सीझन मार्च ते मे अखेरपर्यंत
- 4 जून ते 30 जून : ICC T20 विश्वचषक, यूएसए आणि वेस्ट इंडिज (यजमान)
- जुलै : श्रीलंका वि. 3 वनडे आणि 3 टी-20
- सप्टेंबर : विरुद्ध बांगलादेश, 2 कसोटी आणि 3 T20, (मायदेशी)
- ऑक्टोबर : विरुद्ध न्यूझीलंड, तिसरी कसोटी, (मायदेशी)
- नोव्हेंबर आणि डिसेंबर - विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 5 कसोटी सामन्यांची मालिका
महिला टीम इंडिया 2024 चे वेळापत्रक
- 21 डिसेंबर 2023 ते 9 जानेवारी 2024 : विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 1 कसोटी, 3-3 एकदिवसीय आणि T20, (मायदेशी)
- फेब्रुवारी : मार्च, महिला प्रीमियर लीग सीझन-2
- सप्टेंबर : ICC महिला T20 विश्वचषक, बांगलादेश (यजमान)
- डिसेंबर : विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिसरी वनडे
- डिसेंबर : वि. वेस्ट इंडिज, 3 वनडे आणि 3 टी-20, (मायदेशी)
इतर महत्वाच्या बातम्या