Swiss Open 2023 : सात्विकसाईराज आणि चिरागची कमाल, स्विस ओपनमध्ये पटकावलं 'सुपर 300' चं जेतेपद
Badminton : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग यांनी चीनच्या रेन झियांग यू एन तांग कियांगचा सरळ गेममध्ये पराभव करून सुपर 300 चं विजेतेपद पटकावले.
![Swiss Open 2023 : सात्विकसाईराज आणि चिरागची कमाल, स्विस ओपनमध्ये पटकावलं 'सुपर 300' चं जेतेपद Swiss Open 2023: Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty win doubles Super 300 title know details Swiss Open 2023 : सात्विकसाईराज आणि चिरागची कमाल, स्विस ओपनमध्ये पटकावलं 'सुपर 300' चं जेतेपद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/26/fc115765c4ec309c22ef82b84533a7881679831603717625_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी (Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty) या भारताच्या बॅडमिंटन खेळातील अव्वल दर्जाच्या दुहेरी जोडीने बासेल येथील स्विस ओपन 2023 मध्ये 2023 च्या मोसमातील पहिले विजेतेपद जिंकले आहे. आज म्हणजेच 26 मार्च रोजी झालेल्या अंतिम सामन्यात सात्विक आणि चिराग यांनी दुहेरीचे विजेतेपद पटकावले आणि चीनच्या रेन झियांग यू आणि तांग कियांग यांचा सरळ गेममध्ये पराभव केला.
सात्विक आणि चिराग यांनी जागतिक क्रमवारीत 21 नंबरवरील या जोडीचा 21-19, 24-22 असा 54 मिनिटांत पराभव करून नव्या हंगामात स्थान मिळवलं. रेन आणि तांग या प्रतिस्पर्धी खेळाडूंनी जोरदार बचावात्मक कामगिरी करूनही भारताच्या या स्टार खेळाडूंनी अखेपर्यंत सामन्यावर नियंत्रण ठेवत सामना जिंकला. भारताच्या या दुहेरी जोडीचे प्रशिक्षक मॅथियास बोए यांनी उत्तम प्रशिक्षण दिल्याचं यावेळी दिसून आलं. दरम्यान जेव्हा सात्विक आणि चिरागने रेन आणि टँगला तिसरा गेममध्ये मात देत चौथ्या मॅच पॉइंटच्या रुपात विजय मिळवला. तेव्हा तेथे उपस्थित सर्व भारतीय चाहत्यांनी आनंद साजरा केला. चिरागने तर थेट0 शर्ट काढून आपला आणि देशाचा विजय साजरा केला. सात्विक आणि चिराग यांचे हे बासेलमधील पहिले विजेतेपद होते आणि ऑक्टोबर 2022 मध्ये फ्रेंच ओपन सुपर 750 च्या विजयानंतर या दौऱ्यातील त्यांचे पहिले विजेतेपद होते. जागतिक क्रमवारीत 6 व्या क्रमांकावर असलेल्या या जोडीने 2022 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकासह तब्बल 3 विजेतेपदे जिंकली. त्यांनी जागतिक स्पर्धेतही कांस्यपदक मिळवले. दरम्यान सात्विक दुखापतीच्या चिंतेने त्रस्त होता. ज्यामुळे त्याला फेब्रुवारी 2023 मध्ये बॅडमिंटन आशिया मिश्र सांघिक चॅम्पियनशिपला मुकावे लागले होते.
असा होता प्रवास...
स्विस ओपनमध्ये, या युवा जोडीने उपांत्य फेरीत तिसरे मानांकित ओंग येव सिन आणि तेओ ई यी यांचा पराभव करून उत्कृष्ट फॉर्ममध्ये परतण्याची चिन्हे दर्शविली. 6व्या क्रमांकावर असलेल्या या जोडीने अंतिम फेरीतही उत्तम कामगिरी केली. ज्यामुळे संपूर्ण सामान्यात त्यांनी प्रतिस्पर्धी रेन आणि टँगला कधीही वरचढ होऊ दिलं नाही. पहिल्या गेममध्ये सात्विक आणि चिराग यांच्याकडे 18-13 अशी चांगली आघाडी होती त्यानंतक त्यांनी चीनच्या जोडीला पुनरागमन करू दिलंच नाही. ज्यानंतर या भारतीय स्टार्सनी पहिला गेम जिंकून सुरुवातीलाच आघाडी घेतली. चिनी जोडी सुरुवातीच्या गुणांसह दूर राहिल्याने दुसरा गेम अधिक चुरशीचा ठरला. सात्विक आणि चिराग यांनी आघाडी घेतली पण त्यांनंतर चीनच्या जोडीने 16-16 अशी बरोबरी साधली. चीनच्या जोडीने 3 मॅच पॉइंट वाचवले पण ते पुरेसे नव्हते कारण सात्विक आणि चिरागने विजेतेपदासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाईंट जिंकला. सात्विकसाईराज फ्रंट आणि बॅककोर्ट दोन्ही बाजूंनी मजबूत होता तर चिराग शेट्टीने नेटमध्ये चमकदार कामगिरी केली आणि बचावाचे आक्रमणात रूपांतर करण्याची आपली कला दाखवून दिली. दुसरीकडे बासेलमध्ये पीव्ही सिंधू (महिला एकेरी दुसरी फेरी), लक्ष्य सेन (पुरुष एकेरी पहिली फेरी), किदाम्बी श्रीकांत आणि HS प्रणॉय (पुरुष एकेरी दुसरी फेरी) हे स्टार खेळाडू लवकर बाहेर पडल्यानंतर सात्विक आणि चिराग यांनी भारतीय बॅडमिंटन चाहत्यांना आनंद मिळवून दिला. मार्चच्या सुरुवातीला ऑल इंग्लंड ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या गायत्री गोपीचंद आणि जॉली ट्रीसाही स्विस ओपनमधून लवकर बाहेर पडल्या.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)