एक्स्प्लोर

टीम इंडियाच्या नव्या जर्सीला स्वदेशी जागरण मंचचा विरोध!

मुंबई: ‘ओप्पो’ ही मोबाईल उत्पादक कंपनी टीम इंडियाचा नवा पुरस्कर्ता झाली आहे. भारतीय संघाच्या नव्या जर्सीचं अनावरणही करण्यात आलं. पण आता याच जर्सीला आरएसएसशी निगडीत एका संघटनेनं विरोध केला आहे. क्रीडा मंत्रालयाने यामध्ये हस्तक्षेप करुन ही ओप्पो आणि बीसीसीआयचा करार संपुष्टात आणावा अशी मागणी स्वदेशी जागरण मंचने केली आहे. ओप्पो ही चीनी कंपनी असल्यानं या संघटनेनं जर्सीला विरोध केला आहे. स्वदेशी वस्तूंचे उत्पादन आणि वापर याच्या अभियानासाठी स्वदेशी जागरण मंचाने अभियान सुरु केलं आहे. त्यासाठीच या जर्सीला त्यांनी विरोध केला आहे. या संघटनेकडून केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांना एक पत्र लिहण्यात आलं आहे. 'राष्ट्राभिमान आणि आपल्या नागरिकांचे उद्योगांचे कल्याण यापेक्षा पैसा महत्वाचा नाही. यासाठी आम्ही तुम्हाला या प्रकरणात हस्तक्षेप करुन ओप्पो आणि बीसीसीआयमधील करार संपुष्टात आणण्याची मागणी करत आहोत. 'भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी ओप्पो लिहलेली जर्सी घालू नये' अशी मागणी या संघटनेचे राष्ट्रीय सहसंयोजक अश्वनी महाजन यांनी केली आहे. ‘ओप्पो’ ही मोबाईल उत्पादक कंपनी टीम इंडियाची नवी पुरस्कर्ता आहे. ‘स्टार इंडिया’ ही स्पोर्ट्स नेटवर्क कंपनी 2013 सालापासून टीम इंडियाची मुख्य पुरस्कर्ता होती. पण आता एक एप्रिल 2017 ते 31 मार्च 2022 या पाच वर्षांसाठी टीम इंडियाच्या मुख्य पुरस्कर्त्याचे हक्क ‘ओप्पो’ने मिळवले आहेत. या कालावधीत टीम इंडियाच्या शिलेदारांच्या पोशाखावर ‘ओप्पो’चा लोगोही पाहायला मिळेल. या पाच वर्षांत भारतीय संघ मायदेशात 14 आणि परदेशात 20 मालिकांमध्ये खेळणार आहे.  याच कालावधीत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, आयसीसी क्रिकेट विश्वचषक आणि ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकही खेळवण्यात येणार आहे. ‘ओप्पो’ने 1079 कोटी रुपयांना टीम इंडियाची स्पॉन्सरशिप विकत घेतली आहे. ओप्पोला प्रत्येक द्विपक्षीय सामन्यांसाठी 4.61 कोटी तर आयसीसी मालिकेसाठी 1.56 कोटी रुपये मोजावे लागतील. एवढी किंमत मोजणारी ‘ओप्पो’ ही आतापर्यंतची सर्वात मोठी कंपनी आहे. यापूर्वी ‘सहारा’कडून प्रत्येक सामन्यासाठी सर्वाधिक 3.34 कोटी रुपये दिले जात होते. तर स्टार इंडियाकडून प्रत्येक सामन्यासाठी 1.90 कोटी रुपये आणि आयसीसीच्या मालिकांसाठी 61 लाख रुपये दिले जायचे. संबंधित बातम्या: 'ओप्पो' कंपनी टीम इंडियाची नवी पुरस्कर्ता!
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Rishabh Pant : उपकर्णधारपद गेल्यानं रिषभ पंत नाराज? टीम इंडियाच्या सहायक प्रशिक्षकानं मौन सोडलं, फलंदाजीवर सल्ला देत म्हणाले... 
उपकर्णधारपद गेल्यानं रिषभ पंत नाराज? टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकानं मौन सोडलं, नेमकं काय म्हटलं?

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
Embed widget