Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
Tukaram Mundhe News: राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम राबवत आहे.

Tukaram Mundhe News: राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम (FDA Maharashtra) राबवत आहे. 6 दिवासांत 203 छापे टाकण्यात आले असून यामध्ये 102 अटक करण्यात आली आहे. तर राज्यभरातील जवळपास 68 दुकानं आणि हॉटेल्स बंद करण्यात आली. आयएएस तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी नुकतीच अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली. यानंतर राज्यभरात तिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांविरोधातील कारवाईचा तडाखा लावण्यात आला आहे. (Tukaram Mundhe News)
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही, असं म्हणत कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आता जनतेला थेट तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक आणि ई-मेल आयडी शेअर करण्यात आला आहे. अन्न व औषधाबाबत किंवा गुटखा आणि पानमसालाबाबत नेमकी कुठे तक्रार करायची याची नागरिकांनी माहिती नसते. त्यामुळे आता मुंढे यांनी नागरिकांनी थेट त्यांच्याकडे तक्रार करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.
अन्नातील आणि औषधातील भेसळीच्या तक्रारासाठी टोल फ्री नंबर- (FDA Complaint Number)
- टोल फ्री क्रमांक : 1800222365
- ई-मेल : jc-foodhq@gov.in
अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका आहे?
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 4, 2026
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा ई-मेलवर तक्रार नोंदवा…
📞 १८००२२२३६५
✉️ jc-foodhq@gov.in #अन्नसुरक्षा #ग्राहकजागृती #भेसळमुक्तअन्न #अन्नगुणवत्ता #जागरूकग्राहक#FoodSafety #FoodQuality #MaharashtraGovernment… pic.twitter.com/gd0ARUPXV7
बीडमध्ये तब्बल 18 लाख 50 हजार रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त- (FDA Action In Beed)
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात धडक कारवाया करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर 4 मे रोजी धुळे जिल्ह्यात अन्न औषध प्रशासन विभागाने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक रोखली असून या कारवाईत तब्बल 18 लाख 50 हजार रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. मुंबई आग्रा हा मार्गावरून या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती अन्न औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अन्न औषध प्रशासन विभागाने तब्बल 18 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी चालक सुरेश कुमार गोवरिया राहणार राजस्थान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुकाराम मुंढेंनी 25 मे रोजी स्वीकारला होता पदभार- (Tukaram Mundhe News)
गेल्या काही काळापासून अन्न आणि औषध प्रशासन खात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून चर्चेत आले होते. लाचखोरी आणि इतर भ्रष्ट कामांमुळे चर्चेत असलेल्या अन्न आणि औषध प्रशासनात आता आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आली आहे. तसा आदेश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केला होता. त्यानुसार 25 मे रोजी तुकाराम मुंढे हे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता.
तुकाराम मुंढे यांची आतापर्यंत कोणत्या ठिकाणी बदली झाली? (Tukaram Mundhe News)
- ऑगस्ट 2005 - प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर
- सप्टेंबर 2007 - उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग
- जानेवारी 2008 - सीईओ, जिल्हा परिषद नागपूर
- मार्च 2009 - आयुक्त, आदिवासी विभाग
- जुलै 2009 - सीईओ, वाशिम
- जून 2010 - सीईओ, कल्याण
- जून 2011 - जिल्हाधिकारी, जालना
- सप्टेंबर 2012 - विक्रीकर सहआयुक्त मुंबई
- नोव्हेंबर 2014 - सोलापूर जिल्हाधिकारी
- मे 2016 - आयुक्त, नवी मुंबई महापालिका
- मार्च 2017 - मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे
- फेब्रुवारी 2018 - आयुक्त, नाशिक महापालिका
- नोव्हेंबर 2018 - सहसचिव, नियोजन
- डिसेंबर 2018 -प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई
- जानेवारी 2020 - आयुक्त, नागपूर महापालिका
- ऑगस्ट 2020 - सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
- जानेवारी 2021 - राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत
- सप्टेंबर - 2022 - आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान
- 2022 - मराठी भाषा विभाग
- जुलै 2022 - पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग
- जून 2024 - विकास आयुक्त (असंघटित कामगार)
- ऑगस्ट 2025: सचिव, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, मंत्रालय
- मे 2026: आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही- आयुक्त तुकाराम मुंढे, VIDEO:
संबंधित बातमी:






















