Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Congress Rajya Sabha List: पक्षाच्या हायकमांडने पुन्हा एकदा अनुसूचित जाती समुदायाचे असलेले नीरज डांगी यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांना राजस्थानमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

Congress Rajya Sabha List: काँग्रेसने कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि झारखंडसाठी राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने कर्नाटकातून मल्लिकार्जुन खर्गे, पवन खेरा आणि मन्सूर अली खान यांना, तर मध्य प्रदेशातून मीनाक्षी नटराजन, राजस्थानातून नीरज डांगी, तामिळनाडूतून प्रवीण चक्रवर्ती आणि झारखंडमधून प्रणव झा यांना उमेदवारी दिली आहे.
पवन खेरा गेल्या राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी
काँग्रेसच्या माध्यम आणि प्रसिद्धी विभागाचे अध्यक्ष पवन खेरा गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. पक्ष त्यांना कर्नाटक कोट्यातून राज्यसभेवर पाठवणार आहे. जेव्हा काँग्रेसने 2022 च्या 10 राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली, तेव्हा त्यात पवन खेरा यांच्या नावाचा समावेश नव्हता. ते म्हणाले होते, "कदाचित माझ्या मेहनतीत काहीतरी कमी पडले." हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता पक्षाने त्यांच्या मेहनतीचे फळ दिले आहे.
The Congress President, Shri @kharge, has approved the candidature of the following persons as Congress candidates to contest the biennial/bye-elections to the Council of States from the states mentioned against their names👇 pic.twitter.com/4x4cQNB0kb
— Congress (@INCIndia) June 4, 2026
पक्षाच्या हायकमांडने पुन्हा एकदा अनुसूचित जाती समुदायाचे असलेले नीरज डांगी यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांना राजस्थानमधून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने मध्य प्रदेशमधून राज्यसभेसाठी माजी खासदार मीनाक्षी नटराजन यांना उमेदवारी दिली आहे. त्या राहुल गांधींच्या कोअर टीमच्या दीर्घकाळच्या आणि महत्त्वाच्या सदस्य राहिल्या आहेत. मीनाक्षी नटराजन यांनी मंदसौरमधून लोकसभेच्या खासदार म्हणून काम केले आहे.
27 जागांपैकी, एनडीएकडे सध्या 18 जागा
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी असलेल्या 27 जागांपैकी, एनडीएकडे सध्या 18 जागा आहेत (आंध्र प्रदेशातून एक, गुजरातमधून चार, कर्नाटकातून तीन, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून प्रत्येकी दोन, आणि झारखंड, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधून प्रत्येकी एक). काँग्रेस आघाडीकडे पाच जागा आहेत. वायएसआरसीपीकडे इतर तीन जागा आहेत, त्यापैकी एक जागा पूर्वी बीजेडीकडे होती.
या निवडणुकीत एनडीए 17 जागा जिंकेल अशी अपेक्षा आहे, तर काँग्रेस पाच, जेएमएम दोन आणि टीव्हीके एक जागा जिंकेल अशी अपेक्षा आहे. झोरम पीपल्स मूव्हमेंट मिझोरममध्ये एक जागा जिंकू शकते. वायएसआरसीपी आपल्या तिन्ही जागा गमावू शकते. 244 सदस्यांच्या राज्यसभेत सध्या एनडीएचे 149 खासदार आहेत, तर विरोधी पक्षांकडे 78 आणि आघाडीबाहेरील प्रादेशिक पक्षांकडे 17 खासदार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से






















