एक्स्प्लोर

Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?

Bala Mane Vidhan Parishad Election : कोकण विधानपरिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने कोकणच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मुंबई : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बाळ माने यांनी थेट महायुतीचे नेते आणि भाजप मंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांसोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जात आपला अर्ज मागे घेतला. या धक्कादायक आणि नाट्यमय घडामोडींमुळे कोकण विधानपरिषद निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीचे मतदारच आपल्यासोबत नसल्याचं स्पष्टीकरण देत आपण उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा दावा यावेळी माने यांनी केला.

बाळा माने यांच्या या उघड पक्षविरोधी कारवाईमुळे शिवसेना ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांची नाराजी उफाळून आली असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार तातडीने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

या संपूर्ण राजकीय नाट्यानंतर आता बाळा माने यांच्या पुढील राजकीय प्रवासाबाबत जोरदार चर्चा रंगू लागली आहे. ते मूळचे भारतीय जनता पक्षाचे (BJP) असून रत्नागिरीचे माजी आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी भाजप सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आणि उदय सामंत यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांचा पराभव झाला होता.

Bhaskar Jadhav Connection : भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं

बाळा माने हे कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांचे साडू आहेत. त्यामुळे या संपूर्ण संवेदनशील आणि धक्कादायक प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतः भास्कर जाधव यांच्याशी संपर्क साधून या घडामोडींची माहिती घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, साडू असलेल्या बाळा माने यांच्या या धक्कादायक पक्षविरोधी कारवाईनंतर आणि पक्षातून झालेल्या हकालपट्टीनंतर भास्कर जाधव यांनी या विषयावर माध्यमांशी बोलणं पूर्णपणे टाळलं आहे.

Vidhan Parishad Election : शेतकरी कामगार पक्षाचीही केली होती मनधरणी

महाविकास आघाडीने ही जागा जिंकण्यासाठी मोठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. बाळा माने यांच्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला देखील निवडणुकीतून माघार घेण्यासाठी तयार केले होते आणि त्याचे प्रयत्न यशस्वीही झाले होते. पक्षाने एवढी मोठी राजकीय मोर्चेबांधणी आणि तयारी करून विधान परिषदेसाठी पुन्हा एकदा बाळा माने यांना संधी दिली होती.

ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर आता बाळा माने पुन्हा एकदा आपल्या आधीच्या पक्षात म्हणजेच भाजपमध्ये स्वगृही परतणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, ज्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे, त्यांच्यासोबत शिवसेना पक्ष भक्कमपणे उभा असल्याची घोषणा राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना बाळा माने यांना आपल्या पक्षात घेणार का आणि कोकणात आपली ताकद आणखी वाढवणार का, हे पाहणे महत्त्वाचं ठरेल.

ही बातमी वाचा:

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
MSRTC: राज्यातील ST महामंडळाच्या 1485 हेक्टर जागांच्या खासगीकरणाचा घाट, उत्पन्नवाढीच्या नावाखाली मोक्याच्या जागांवर डोळा
राज्यातील ST महामंडळाच्या 1485 हेक्टर जागांच्या खासगीकरणाचा घाट, उत्पन्नवाढीच्या नावाखाली मोक्याच्या जागांवर डोळा
Eknath Khadse: 26/11च्या हल्ल्यावेळी आतंकवाद्यांना मारण्यासाठी बंदुक घेऊन रस्त्यावर उतरलो, खडसेंनी काळजीपोटी रोखलं; गिरीश महाजनांच्या दाव्याला एकनाथ खडसेंच प्रत्युत्तर, म्हणाले...
26/11च्या हल्ल्यावेळी आतंकवाद्यांना मारण्यासाठी बंदुक घेऊन रस्त्यावर उतरलो, खडसेंनी काळजीपोटी रोखलं; गिरीश महाजनांच्या दावा, आता एकनाथ खडसेंच सणसणीत प्रत्युत्तर, म्हणाले...
Ladki Bahin Yojana: 'आधी योजना आणायची अन् नंतर नावे कापायची, हेच तर सरकारचं धोरण'; योजनेतून नावं बाद झाल्याने बीडमधील महिला नेत्यांसह 'लाडक्या बहिणी' संतापल्या!
'आधी योजना आणायची अन् नंतर नावे कापायची, हेच तर सरकारचं धोरण'; योजनेतून नावं बाद झाल्याने बीडमधील महिला नेत्यांसह 'लाडक्या बहिणी' संतापल्या!
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
Mumbai Crime News: 'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
Gold Silver Rate : अमेरिका इराण युद्धामुळं सोने- चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
तुकाराम मुंढेंच्या FDA ची संभाजीनगरमध्ये ऑईल कंपनीवर धाड; पाम तेलासह 2 कोटी 93 लाखांचे खाद्यतेल जप्त
तुकाराम मुंढेंच्या FDA ची संभाजीनगरमध्ये ऑईल कंपनीवर धाड; पाम तेलासह 2 कोटी 93 लाखांचे खाद्यतेल जप्त
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद
Embed widget