एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मुरली विजयला शिवी देताना स्मिथ कॅमेऱ्यात कैद

धर्मशाला : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या धर्मशालातील अंतिम कसोटीतही टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमधील स्लेजिंग कमी होताना दिसत नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आता भारताचा सलामीवीर फलंदाज मुरली विजयला शिवी देताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात जोश हेझलवूडचा झेल मुरली विजयने घेतला. त्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू सेलिब्रेशन करत पॅव्हेलियनकडे निघाले. मात्र पंचांनी हेझलवूडला बाद देण्यास नकार दिला. पंचांच्या निर्णयानंतर भारतीय खेळाडूंना परत बोलावण्यात आलं तेव्हा मुरली विजय मैदानाकडे धावत येत असताना ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या स्टीव्ह स्मिथने मुरली विजयला शिवी दिली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. https://twitter.com/DennisCricket_/status/846314170341457920 ऑस्ट्रेलिया आणि भारताचे चारही कसोटी सामने खेळाडूंच्या वादामुळे चांगलेच चर्चेत राहिले. धर्मशाला कसोटीतच ग्लेन मॅक्सवेलच्या विकेटनंतर जाडेजा आणि मॅथ्यू वेड यांच्यातील तणाव वाढला होता. सामन्यात तुमचा पराभव झाल्यानंतर निवांतपणे सोबत डीनर करु, असं आपण मॅथ्यू वेडला म्हणाल्याचं जाडेजाने सांगितलं. जाडेजाने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातही महत्वाच्या तीन विकेट्स घेतल्या. विराट-स्मिथचा डीआरएस वाद बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात उमेश यादवच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथ पायचीत असल्याचं अपील पंचांनी उचलून धरलं, त्या वेळी स्मिथने डीआरएसचा कौल मागण्यासाठी ड्रेसिंग रूममधल्या आपल्या सहकाऱ्यांकडे सहाय्याची अपेक्षा केली होती. भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याविरोधात पंचाकंडे तक्रार केली. त्यामुळे उभय कर्णधारांमध्ये वादाची ठिणगी पडली. बंगळुरू कसोटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने स्मिथच्या त्या कृतीवर जाहीर टीका केली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अध्यक्षांचाही विराटला टोमणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष जेम्स सदरलँड यांनी विराट कोहलीवर निशाणा साधला होता. कोहलीला सॉरी म्हणता येत नाही, एवढचं नव्हे तर त्याला सॉरीची स्पेलिंगही माहित नसेल, असं वक्तव्य सदरलँड यांनी एका रेडिओ स्टेशनशी बोलताना केलं. धर्मशाळा इथे होणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलियातील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन मीडिया टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या हात धुवून मागे लागल्याचं चित्र आहे. यामध्ये आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष जेम्स सदरलँड यांनीही उडी घेतली आहे. बंगळुरु कसोटीत विराटने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथवर डीआरएसप्रकरणी जाहीर टीका केली होती. त्यानंतर विराटने स्मिथची माफी मागावी, अशी मागणी सदरलँड यांनी केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी या मुद्द्यावरुन विराटवर निशाणा साधला. ऑस्ट्रेलियन मीडियाचा विराटवर निशाणा ऑस्ट्रेलियन मीडियाकडून सतत विराटला लक्ष्य केलं जात असल्याचं चित्र आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाने विराटची तुलना नुकतीच ‘क्रीडा जगतातील ट्रम्प’ अशी केली होती. त्यानंतर विराटच्या समर्थनार्थ बिग बी अमिताभ बच्चन आणि सुनील गावसकरही मैदानात उतरले होते. ऑस्ट्रेलियन मीडिया हा ऑस्ट्रेलिया संघाचा सपोर्टिंग स्टाफ आहे, असं सुनील गावसकर म्हणाले होते. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही ऑस्ट्रेलियन मीडियाला प्रत्युत्तर दिलं होतं. ऑस्ट्रेलियन मीडियाने विराटला खेळातील ट्रम्प म्हटलं आहे. त्याबद्दल आभार, विराट विजेता आहे आणि राष्ट्रपतीही, हे ऑस्ट्रेलियाने स्वीकारलं आहे, असं खणखणीत उत्तर बिग बींनी दिलं होतं. विराटने आयपीएलमध्ये खेळण्यासाठी विश्रांती घेतली : ब्रॅड हॉज विराटवर तोंडसुख घेणाऱ्या ऑस्ट्रेलियन मंडळींच्या यादीत आता माजी कसोटीवीर ब्रॅड हॉजच्या नावाची भर पडली आहे. विराटला तिसऱ्या कसोटीत झालेल्या खांद्याच्या दुखापतीमुळं धर्मशालाच्या चौथ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली. पण ब्रॅड हॉजचा आरोप आहे की, भारतीय कर्णधाराने आयपीएलमध्ये खेळता यावं म्हणून चौथ्या कसोटीतून विश्रांती घेतली आहे. आयपीएलच्या बंगळुरु आणि हैदराबाद संघांमधल्या सलामीच्या आयपीएल सामन्यात विराट खेळला तर ते खूप वाईट असेल, असं भाष्यही त्यानं केलं. ब्रॅड हॉज हा आयपीएलमधल्या गुजरात लायन्स संघाचा प्रशिक्षकही आहे. त्यामुळं आयपीएलमध्ये बंगलोरचा कर्णधार असलेल्या विराटवर टीका करून तो आपला दुहेरी हेतू साध्य करतो आहे का, असा प्रश्न भारतीय क्रिकेटरसिकांना पडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला पुण्यातून सुरुवात झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीवर ऑस्ट्रेलियन मंडळींकडून टीकेचं सत्र सुरु झालं आहे. बंगळुरु कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि विराटमध्ये डीआरएसवरुन बिनसलं होतं. संबंधित बातम्या :

सामना हरल्यानंतर डिनरला ये, जाडेजाचं मॅथ्यू वेडला निमंत्रण

विराटच्या समर्थनार्थ बिग बी पुन्हा मैदानात, ब्रॅड हॉजला टोला

आयपीएलमध्ये खेळण्यासाठी विराटने विश्रांती घेतली : ब्रॅड हॉज

विराटला ‘सॉरी’ची स्पेलिंगही येत नसेल : जेम्स सदरलँड

कर्णधार स्मिथचा खोटेपणा, डीआरएससाठी ड्रेसिंग रुमकडे इशारा!

डीआरएस वाद , बीसीसीआय-क्रिकेट ऑस्ट्रेलियात वादाची ठिणगी

ऑस्ट्रेलियन मीडियाकडून विराट कोहलीची डोनाल्ड ट्रम्प यांच्यांशी तुलना

कोहली वि. ऑस्ट्रेलियन मीडिया : विराटच्या समर्थनार्थ बिग बी मैदानात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget