एक्स्प्लोर

Year Ender 2022 : विराटच्या परतलेल्या फॉर्मपासून ते मेस्सीच्या साकार झालेल्या स्वप्नापर्यंत, 2022 मध्ये क्रीडा विश्वात काय-काय घडलं?

Sport Year Ender 2022 : यंदाचं वर्ष अर्थात 2022 क्रीडाविश्वासाठी फारच घडामोडींचं होतं. वर्षांच्या सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत मोठमोठ्या इव्हेंट पार पडल्या. यामध्ये भारतीय खेळाडूंनीही चमकदार कामगिरी केली.

Year Ender 2022 Sports : खेळ खेळल्यावर मानसिक आणि शारिरीक स्वास्थ उत्तम राहतं हे अगदी बालवाडीपासून शिकवलं जातं... त्यामुळे आपल्या जीवनात खेळाचं महत्त्व फार आहे. त्यामुळे 2022 या सरत्या वर्षाला निरोप देताना विचार केला तर 2022 हे वर्षे खेळाच्या दृष्टीने कमालीचं हॅपनिंग होतं...खासकरुन भारतीयांचा आवडता खेळ क्रिकेटच्या बऱ्याच स्पर्धा या वर्षभरात झाल्या. तर वर्षाची सांगता, जगप्रसिद्ध खेळ फुटबॉलच्या विश्वचषकाने अर्थात फिफा वर्ल्डकप स्पर्धेने झाली. तसंच कॉमनवेल्थ स्पर्धेतही भारतानं आपला आजवरचा दमदार खेळ दाखवला. तर या सर्वच स्पर्धांबाबत अर्थात 2022 मधील क्रीडा घडामोडींबाबत जाणून घेऊ... 

तर वर्षाची सुरुवात म्हणाल... तर लेडिज फर्स्ट असंच काहीसं म्हणत महिलाच्या एकदिवसीय वर्ल्ड कपनं भारतासाठी क्रीडा स्पर्धांची सुरुवात झाली. 4 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान न्यूझीलंडमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत भारतीय महिलांनी तशी चांगली कामगिरी केली. पण अवघा एक पॉईंट कमी पडला आणि 8 स्पर्धकांमधून भारतीय महिला सेमीफायनलमध्ये जाऊ शकल्या नाहीत. पुढे फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला मात देत वर्ल्डकप जिंकला. एकीकडे महिला विश्वचषक खेळत असताना जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीग अर्थात आयपीएल (IPL 2022) भारतात सुरु झाली.  26 मार्च ते 29 मे दरम्यान पार पडलेल्या यंदाच्या आयपीएलमध्ये नव्याने सामिल झालेल्या लखनौ आणि गुजरात संघामुळे 10 संघातील ही स्पर्धा कमालीची रंगतदार झाली. फायनलमध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्स मात देत आयपीएल 2022 (IPL 2022) ची ट्रॉफी खिशात घातली.

Year Ender 2022 Sports : बॅडमिंटन संघाचा ऐतिहासिक विजय

दरम्यान एकीकडे क्रिकेट स्पर्धा होत असताना दुसरीकडे भारताच्या बॅडमिंटनपटूंनी इतिहास लिहिला.बॅडमिंटन खेळाची भव्य स्पर्धा असणाऱ्या थॉमस कपमध्ये (Thomas Cup) भारतानं पहिला वहिला विजय मिळवला. लक्ष्य सेन, किंदम्बी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीचे तर सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीचे सामने जिंकत भारताला 5 पैकी 3 सामने जिंकवून देत विजय मिळवून दिला आहे. तब्बल 73 वर्षानंतर भारताने उंचावलेला हा थॉमस कप सर्वच भारतीयांसाठी खास ठरला. यानंतर 27 जून ते 10 जुलै दरम्यान जागतिक टेनिसमधील मानाची स्पर्धा असणाऱ्या विम्बल्डनमध्ये पुरुष एकेरीत सर्बियाचा चॅम्पियन टेनिसपटू नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला मात देत स्पर्धा जिंकली. तर महिलांमध्ये कझाकिस्तानची महिला टेनिसपटू एलेना  रिबाकिना ट्युनिशियाच्या ओन्स जेबुर हिला मात देत विजय मिळवला.

Year Ender 2022 Sports : कॉमनवेल्थमध्ये भारताची दमदार कामगिरी

यानंतर जुलै-ऑगस्ट दरम्यान क्रिकेटला थोडा ब्रेक देऊन भारतीयांनी कॉमनवेल्थ स्पर्धेत विविध खेळांचा आनंद लुटला. इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडूंनीही दमदार कामगिरी केली. भारताने यंदा 61 पदकांवर यंदा नाव कोरत चौथं स्थान मिळवलं. यामध्ये 22 सुवर्णपदकांचा, 15 रौप्यपदकांचा तर23 कांस्य पदकांचा समावेश होता. विविध खेळात भारताच्या विविध खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. तर कॉमनवेल्थमध्ये भारतासाठी पदक जिंकलेले खेळाडू पुढीलप्रमाणे

सुवर्णपदक- 22
मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना पटेल, नीतू घणघस, अमित पंघाल, एल्डहॉस पॉल, निकहत जरीन, शरथ-श्रीजा, पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, बॅडमिंटन पुरुष दुहेरी संघ, शरथ कमाल

रौप्यपदक- 15
संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियंका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर, शरथ-साथियान, महिला क्रिकेट संघ, सागर, पुरुष हॉकी संघ.

कांस्यपदक- 23
गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ , संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव-दीपिका, किदम्बी श्रीकांत, त्रिशा-गायत्री, साथियान गनसेकरन

Year Ender 2022 Sports : गोल्डन बॉय नीरज चोप्राचं दमदार पुनरागमन

आता या सर्व खेळाडूंमध्ये एक महत्त्वाचं नाव नव्हतं. ते म्हणजे गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra).  दुखापतीमुळे कॉमनवेल्थला मुकलेल्या नीरजनं जोरदार पुनरागमन केलं ते डायमंड लीग स्पर्धेत. सप्टेंबरमध्ये झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत नीरजनं या स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला. नीरजनं पहिल्याच प्रयत्नात 89.08 मीटर अंतरावर भाला फेकला.  यानंतर  दुसऱ्या प्रयत्नात त्याने 85.18 मीटर भाला फेकला. यानंतर त्यानंतर त्यानं तिसरा थ्रो केलाच नाही. त्यानंतर चोप्राचा चौथा प्रयत्न फाऊल घोषित झाला आणि नंतर त्याने पाचव्या प्रयत्न देखील केला नाही. पहिल्या थ्रोच्या बळावर नीरजला विजयी घोषित करण्यात आलं. विशेष म्हणजे या विजयाच्या जोरावर त्याने हंगेरीतील बुडापेस्ट येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 मध्येही प्रवेश मिळवला आहे.

Year Ender 2022 Sports : दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररचा टेनिस कोर्टाला अलविदा

टेनिस कोर्टचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडररनं (Roger Federer) 15 सप्टेंबर रोजी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आणि सप्टेंबर अखेरीस झालेल्या लेव्हर चषक स्पर्धेत कारकीर्दीतील अखेरचा सामना खेळला. त्याच्या निवृत्तीनंतर जगभरातील टेनिस फॅन्स भावनिक झालेच पण त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदाललही ढसाढसा रडला होता. क्रीडा जगतातील खासकरुन टेनिसमधील एक लेजेंडही याच वर्षात निवृत्त झाला. 

Year Ender 2022 Sports : आशिया कपमध्ये पुरुष पराभूत पण महिला विजयी

आता या सर्व स्पर्धानंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या स्पर्धांना सुरुवात झाली आणि युएईमध्ये पुरुष आशिया कप स्पर्धा सुरु झाली. भारताला स्पर्धेत नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही.ज्यामुळे फायनलपर्यंत इंडियाला पोहोचता आलं नाही आणि फायनलमध्ये श्रीलंकेनं पाकिस्तानंचा धुव्वा उडवत ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताला स्पर्धा जिंकता आली नसली तरी सर्व भारतीय क्रिकेप्रेमी वाट पाहत असलेली किंग विराट कोहलीचं 71 वं शतक या स्पर्धेतून समोर आलं. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटनं नाबाद 122 धावा ठोकत बहुप्रतिक्षित अशी 71 वी सेन्चूरी पूर्ण केली.  

या स्पर्धेनंतर लगेचच 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान महिलांचा आशिया कप झाला आणि जे पुरुष संघ करु शकला नाही ते महिलांनी करु दाखवलं. फायनलमध्ये बांगलादेशला मात देत भारतीय महिलांनी आशिया चषक 2022 जिंकला. या विजयाचं सेलिब्रेशन करत बीसीसीआयनं एक ऐतिहासिक निर्णय घेतला. 27 ऑक्टोबर बीसीसीआयनं एक मोठं पाऊल उचलत पुरुष क्रिकेटर्सप्रमाणेच महिला क्रिकेटर्सनाही समान मानधन मिळणार असल्याची ऐतिहासिक घोषणा केली. ज्यानुसार महिलांनाही कसोटी सामन्यांसाठी 15 लाख, वनडेसाठी 6 लाख तर टी-20 सामन्यांसाठी 3 लाख खेळा़डूंना मिळणार आहेत.

Year Ender 2022 Sports : विराटचा फॉर्म परतला...

महिलांनी 15 ऑक्टोबरला आशिया कप उंचावला आणि 16 ऑक्टोबरपासून पुरुषांच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली. पाकिस्तानवर रोमहर्षक विजयाने भारताने स्पर्धेची सुरुवात केली. किंग कोहलीनं नाबाद 82 धावांची खेळी करत आपला फॉर्म पुन्हा गवसत भारताला विजय मिळवून दिला. पुढे जाऊनही भारतानं चांगला खेळ दाखवला, सेमीफायनलपर्यंत भारत सुसाट होता. पण सेमीफायनलमध्ये इंग्लंडनं 10 विकेट्सनी दारुण पराभूत करत भारताचं स्पर्धेतील आव्हान संपवलं. मग 13 नोव्हेंबरला इंग्लंडने पाकिस्तानलाही मात देत विश्वचषकावर नाव कोरलं.पण वर्षअखेर 17 डिसेंबरला भारतानं टी20 अंधविश्वचषकात मात्र बांगलादेशला मात देत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला.

Year Ender 2022 Sports : लिओनल मेस्सीचं स्वप्न साकार

क्रिकेटच्या बऱ्याच स्पर्धानंतर वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर गाजवला तो फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेने (Fifa World Cup 2022). कतारमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेची फायनल जगातील स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने जिंकत विश्वचषकावर नाव कोरलं. विशेष म्हणजे रोनाल्डो आणि मेस्सी या स्टार खेळाडूंच्या निवृ्त्तीच्या चर्चांमुळे त्यांचा हा अखेरचा विश्वचषक होता. रोनाल्डोचं स्वप्न तर अधुरं राहिलं असलं तरी मेस्सीने मात्र फायनलमध्ये फ्रान्सला मात देत विजय मिळवला. विशेष म्हणजे वर्ल्डकपची फायनल इतकी रोमहर्षक झाली की अखेरच्या क्षणापर्यंत कोण जिंकेल हे कळत नव्हते, फ्रान्सच्या 23 वर्षीय एम्बाप्पेनंही कमालीची झुंज दिली पण अखेर अर्जेंटिना संघानेच विजय मिळवला... याच रोमहर्षक सामन्याप्रमाणे 2022 वर्षही क्रीडाविश्वासाठी रंगतदार ठरलं... आता येत्या 2024 वर्षांतही पुरुष एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपसह बऱ्याच स्पर्धा आहेत...ज्यांच्यासाठी क्रीडाविश्व नक्कीच उत्सुक आहे...

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Jitendra Awhad Full PC : प्रतिभा पवारांची गेटवर अडवणूक प्रकरण, जितेंद्र आव्हाड अजितदादांवर कडाडलेSantosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Embed widget