एक्स्प्लोर

भारताकडून मायदेशात पराभव, द. आफ्रिकेला विश्वचषकाची चिंता

भारताकडून पहिल्यांदाच मायदेशात पराभव स्वीकारावा लागल्याने दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांना विश्वचषकाची चिंता सतावू लागली आहे.

पोर्ट एलिझाबेथ : विश्वचषकापूर्वी मिळालेल्या पराभवाने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची पोलखोल केली आहे. वेगवान गोलंदाजांसाठी नेहमीच फायदेशीर ठरणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील मैदानांवर भारतीय फिरकीपटूंनी धुरा सांभाळली आहे. लेग स्पिनर यजुवेंद्र चहलने पाच सामन्यात 14, तर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने 16 विकेट घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना भारतीय फिरकीपटू जोडीचं कोडं अजूनही उलगडलेलं नाही. त्यामुळे भारताकडून पहिल्यांदाच मायदेशात पराभव स्वीकारावा लागल्याने दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांना विश्वचषकाची चिंता सतावू लागली आहे. दरम्यान, विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार आहे आणि तिथे फिरकीपटूंना मदत मिळत नाही, या आशेने दक्षिण आफ्रिकेचा संघ स्वतःला दिलासा देत आहे. फलंदाजांची परिस्थिती पाहून गिब्सन यांनी मान्य केलं आहे, की भारताकडे जागतिक दर्जाचे फिरकीपटू आहेत. मात्र इंग्लंडमध्ये ते एवढे फायदेशीर ठरतील, असं वाटत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ''भारताकडे दोन जागतिक दर्जाचे फिरकीपटू आहेत आणि ते कुठेही चेंडू वळवू शकतात. मात्र याचा सामना करण्याची तयारी करण्यासाठी आमच्याकडे अजून पूर्ण वर्ष बाकी आहे. मात्र या गोलंदाजांना इंग्लंडमध्ये एवढी मदत मिळेल असं वाटत नाही,'' असं गिब्सन म्हणाले. सहा सामन्यांच्या वन डे मालिकेत भारत 4-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे गिब्सन पराभवामुळे नाराज आहेत. ''ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंना सांगितलं होतं, की पराभवाला काहीही कारण देता येणार नाही, फक्त आपण चांगला प्रयत्न करु शकतो. मात्र या पराभवाने आम्हाला पुढचा विचार करण्यास भाग पाडलं आहे,'' असं गिब्सन म्हणाले. ''आमचं सर्व लक्ष सध्या विश्वचषकावर आहे, हे मलाही माहिती आहे. मात्र आज जो संघ आहे, तोच विश्वचषक खेळण्यासाठी जाणार नाही,'' असंही गिब्सन यांनी सांगितलं. विराट कोहलीच्या टीम इंडियाने पोर्ट एलिझाबेथची पाचवी वन डे जिंकून दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पहिल्यांदाच वन डे सामन्यांची मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला. भारताने दक्षिण आफ्रिकेला 201 धावांत गुंडाळून, पाचव्या वन डेत 73 धावांनी विजय साजरा केला. टीम इंडियाने या विजयासह सहा सामन्यांच्या मालिकेत 4-1 अशी विजयी आघाडी घेतली. संबंधित बातम्या :

VIDEO : सामन्याला कलाटणी देणारा पंड्याचा भन्नाट 'थ्रो'

धोनीने घेतलेला DRS निर्णय चुकला, सोशल मीडियावर ट्रोल

भारताने द. आफ्रिकेत वाईट इतिहास पुसत नवा इतिहास रचला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget