Shakib Al Hasan : खासदार होताच अवघ्या 24 तासांत राजकीय मस्तीचे दर्शन; शाकिब अल हसननं चाहत्याच्या कानशिलात लगावली!
Shakib Al Hasan : शाकिबचे मैदानातील वर्तनही बऱ्याचवेळा चर्चेचा विषय झाला आहे. इतकंच नाही, तर वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजविरोधात टाईम आऊटचे अपील करण्यात शाकीबचाच निर्णय होता.
Shakib Al Hasan : बांगलादेश क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार शकिब अल हसनने शाकिब अल हसनने पहिली निवडणूक सुमारे दीड लाख मतांनी जिंकली. राजकारणात प्रवेश केल्यानंतरही शाकिब क्रिकेट खेळत राहणार आहे. आपण दोन्ही जबाबदाऱ्या घेण्यास तयार असल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. दरम्यान, शाकीबच्या राजकीय मस्तीचे पहिल्याच दिवशी दर्शन झालं आहे.
शाकीब अल हसननं चाहत्याच्या कानशिलात लगावली!
बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकीनंतर शेख हसीना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकलेल्या या निवडणुकीत हसीना यांच्या पक्षाने 300 पैकी 200 जागा जिंकून सत्ता राखली आहे. या निवडणुकीत शाकीब उल हसन सुद्धा विजयी झाला. यानंतर त्याने आता एका चाहत्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शाकिबचे मैदानातील वर्तनही बऱ्याचवेळा चर्चेचा विषय झाला आहे. इतकंच नाही, तर वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजविरोधात टाईम आऊटचे अपील करण्यात शाकीबचाच निर्णय होता. यावेळी सुद्धा त्याच्या खिलाडूवृत्तीवर टीका झाली.
Shakib Al Hasan slapped a fan..!pic.twitter.com/KaUbabgkCX
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 7, 2024
दीड लाख मतांनी विजय मिळवला
दरम्यान, तिन्ही फॉरमॅटमध्ये बांगलादेशचे कर्णधार असलेल्या शकीब अल हसनला त्याच्या देशात झालेल्या संसदीय निवडणुकीत संसदीय जागा जिंकण्यात यश आले. साकिबने पश्चिम शहरातील मागुरा येथील संसदीय जागा प्रचंड मतांनी जिंकली. शाकिबने याआधीच आपल्या विजयाचा दावा केला होता. आपल्याला कोणीही आव्हान देऊ शकणार नाही, असे त्यांनी निवडणुकीपूर्वीच सांगितले होते आणि तसेच झाले. त्याने सुमारे दीड लाख मतांनी विजय मिळवला. शाकिब सध्या बांगलादेश क्रिकेट संघासोबत नाही. निवडणूक प्रचारासाठी त्याने न्यूझीलंड दौऱ्यापासून स्वतःला दूर ठेवले होते.
Shakib Al Hasan beaten by his fan while he was campaigning for the elections.
— Mr. TROLL (@MR_CricTroll) January 7, 2024
Just Shakib things 😂#BangladeshElectionspic.twitter.com/2nan8Bv5nv
2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात शाकिब बांगलादेशचा कर्णधार
गेल्यावर्षी भारतात खेळल्या गेलेल्या 2023 एकदिवसीय विश्वचषकात शाकिब अल हसन बांगलादेशचा कर्णधार होता. मात्र, त्याच्या कर्णधारपदाखाली ना संघाची कामगिरी चांगली झाली, ना शाकिब स्वत: काही चमत्कार करू शकला. यानंतर त्यांच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र राजकारणात प्रवेश करण्याच्या घोषणेनंतर आपण अद्याप निवृत्ती घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. राजकारणासोबतच क्रिकेटही खेळणार असल्याचे सांगितले होते.
इतर महत्वाच्या बातम्या