Sachin Tendulkar : सचिनला सिंधुदुर्गातील समुद्रकिनाऱ्याची अन् मालवणी पाहुणचाराची भूरळ; जुना व्हिडिओ शेअर करत दिला आठवणींना उजाळा
Sindhugurg : भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) सिंधुदुर्गातील (Sindhugurg) समुद्र किनाऱ्यांची आणि मालवणी पाहुणचाराची चांगलीच भूरळ पडली आहे. सचिनने त्याचा 50 वा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे या समुद्र किनाऱ्यावर साजरा केला होता.
Sindhugurg : भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) सिंधुदुर्गातील (Sindhugurg) समुद्र किनाऱ्यांची आणि मालवणी पाहुणचाराची चांगलीच भूरळ पडली आहे. सचिनने त्याचा 50 वा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे या समुद्र किनाऱ्यावर साजरा केला होता. त्याला आता 250 दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. मात्र, सिंधुदुर्गातील (Sindhugurg) आदरातिथ्य, आपुलकीपणा आजही मनाला भुरळ घालत असल्याचं ट्विट सचिननं केलं आहे. सिंधुदुर्गातील किेल्ले आणि गावांतील आठवणींनाही सचिनने पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.
सचिनने समुद्र किनाऱ्यावर लुटला होता क्रिकेटचा आनंद
सचिनने 50 वा वाढदिवस सिंधुदुर्गात साजरा करण्यासाठी गेला, तेव्हा त्याने समुद्र किनाऱ्यावरील क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला होता. तेव्हाचा एक सचिनने पुन्हा एकदा शेअर केला आहे. किल्ले निवती समुद्र किनाऱ्यावरील फोटो आणि व्हिडिओ सचिनने पुन्हा एकदा शेअर केले आहेत. त्यावेळी सचिनचे अप्रतिम आदरातिथ्य करण्यात आले होते. सचिनसाठी आजही त्या आठवणी मनात घर करुन बसल्या आहेत. त्याने या आठवणींचा खजिना व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
भारतातील सर्वांत सुंदर किनारपट्टी सिंधुदुर्गात
सचिनने व्हिडिओ शेअर करताना भारतातील सर्वांत सुंदर किनारपट्टी कोकणात असल्याचे म्हटले आहे. कोकणातील लोकांनी केलेला पाहुणचार वर्ष उलटत आले तरीही तो विसरलेला नाही. शिवाय, त्याने "अतिथी देवो भवो" या आपल्या संस्कृतीबरोबरच समुद्र किनाऱ्यांमुळेही आपण समृद्ध झालो असल्याचे सचिनने (Sachin Tendulkar) इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे.
हरभजन सिंगकडून सचिनच्या फलंदाजीचे कौतुक
जुन्या आठवणींना उजाळा देताना सचिनने (Sachin Tendulkar समुद्र किनाऱ्यावरिल पोस्ट केलेल्या क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ पोस्ट केलाय. यावर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने प्रतिक्रिया दिली आहे. "पाजी तुमची फलंदाजी अतुलनीय आहे", अशी प्रतिक्रिया हरभजन सिंगने दिली आहे.
मालदीवला विरोध सुरु असतानाच सचिनला महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यांची भूरळ
नव्या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचा दौरा केला. लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर लक्षद्वीप जगभरात ट्रेडिंगमध्ये आहे. लक्षद्वीपच्या सौंदर्यावर मोदींनी भाष्य केल्यानंतर मालदीवच्या नेत्यांनी भारतासंबंधित वादग्रस्त भाष्य केलं. त्यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी लक्षद्वीपला पाठिंबा देत आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, आता सचिन तेंडुलकरने एक पाऊल पुढे टाकत महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यांचे कौतुक करत फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. सेलिब्रिटींना मालदीव आणि लक्षद्वीपमधील समुद्र किनाऱ्यांची भूरळ पडत असताना सचिनने (Sachin Tendulkar) मात्र महाराष्ट्रातील आठवणींना उजाळा दिलाय.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या