एक्स्प्लोर

Shaji Prabhakaran: दिल्ली फुटबॉलचे अध्यक्ष शाजी प्रभाकरन एआयएफएफचे नवे महासचिव

Shaji Prabhakaran Appointed AIFF Secretary General: दिल्ली फुटबॉलचे अध्यक्ष आणि दिर्घकाळ खेळ प्रशासक राहिलेल्या शाजी प्रभाकरन (Shaji Prabhakaran) यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (All India Football Federation) महासचिवपदी नियुक्ती (AIFF Secretary General) करण्यात आली.

Shaji Prabhakaran Appointed AIFF Secretary General: दिल्ली फुटबॉलचे अध्यक्ष आणि दिर्घकाळ क्रीडा प्रशासक राहिलेल्या शाजी प्रभाकरन (Shaji Prabhakaran) यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (All India Football Federation) महासचिवपदी नियुक्ती (AIFF Secretary General) करण्यात आली. एआयएफएफच्या नवनियुक्त समितीनं शाजी प्रभाकरन यांची ही नियुक्ती केलीय. एआयएफएफचे नवे अध्यक्ष कल्याण चौबे यांच्या अध्यक्षाखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या निवडणुकीत कल्याण चौबे यांनी दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतियाचा (Bhaichung Bhutia) पराभव केलाय. 

चौबे यांनी एआयएफएफच्या महासचिव पदासाठी प्रभाकरन यांच्या नावाची शिफारस केली, जी सदस्यांनी एकमतानं मान्य केली. एआयएफएफनं एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. एआयएफएफमध्ये बदलाची मागणी करणाऱ्या गटाच्या नेत्यांपैकी एक असलेल्या प्रभाकरन यांनी निवडणूक लढवली नाही. सदस्यांचं स्वागत करताना चौबे म्हणाले, "माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा माजी दिग्गज खेळाडूंचा समितीचा भाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे."

एआयएफएफचं ट्वीट- 

एआयएफएफच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीत कल्याण चौबेंचा एकतर्फी विजय
एआयएफएफ निवडणुकीसाठी शुक्रवार नवी दिल्लीत मतदान झालं. या निवडणुकीत कल्याण चौबे यांनी भुतियाविरुद्ध 33-1 अशा मोठ्या फरकानं विजय मिळवलाय. एआयएफएफच्या 85 वर्षांच्या इतिहासात कल्याण चौबे यांच्या रुपात पहिल्यांदाच माजी खेळाडूची अध्यक्षपदी निवड झालीय. तर, एनए हरिस यांची उपाध्यक्षपदी जबाबदारी संभाळतील. हरिस हे कर्नाटक फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आणि राज्यातील काँग्रेसचे आमदार आहेत. भारतातील 36 राज्य फुटबॉल संघटनांपैकी केवळ 34 संघटनांनी निवडणुकीत भाग घेतला. लडाख आणि जम्मू आणि काश्मीरला मतदान करण्याची परवानगी नव्हती.

नाट्यमय घडामोडींनाही पूर्णविराम
एआयएफएफच्या निवडणुकीमुळं भारतीय फुटबॉलमधील गेल्या काही महिन्यांतील नाट्यमय घडामोडींनाही पूर्णविराम मिळाला. दरम्यान, भारतीय फुटबॉलनं माजी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना डिसेंबर 2020 मध्ये निवडणूक न घेतल्यानं पदावरून हटवण्यात आलं. यानंतर प्रशासकांची समिती स्थापन करण्यात आली, जी नंतर सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या दरम्यान, आंतरराष्ट्रीय फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉलनं एआयएफएफवर निलंबनाची कारवाई केली होती. एआयएफएफमध्ये ‘तिसऱ्या पक्षाचा’ हस्तक्षेप वाढला असल्याचं कारण देऊन फिफानं तात्काळ निलंबनाची कारवाई  केली होती.

हे देखील वाचा- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget