Saurav Ganguly : सौरव गांगुलींच्या एका गुगलीने खळबळ, पण दादाचा बंगालसाठी 'तो' मास्टर प्लॅन, तर नाही ना ?
टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आज ट्विटरवर ट्विस्ट केलेल्या ट्विटने एकच खळबळ उडाली आहे. तथापि, याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.
Saurav Ganguly : टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आज ट्विटरवर ट्विस्ट केलेल्या ट्विटने एकच खळबळ उडाली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी गांगुली यांच्या ट्विटनंतर राजीनामा दिल्याचे वृत्त पसरल्यानंतर तातडीने खुलासा केला. गांगुली यांनी पदाचा राजीनामा दिला नसल्याचे त्यांनी सांगितले.
सौरव गांगुली यांनी ट्विट करून सांगितले की, 1992 मध्ये क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर 2022 मध्ये 30 वर्ष पूर्ण होत आहेत. तेव्हापासून क्रिकेटनं मला खूप काही दिलं आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांचा मला पाठिंबा मिळाला आहे. या प्रवासाचे साक्षीदार राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी धन्यवाद देऊ इच्छितो. ज्यांनी मी आहे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पाठिंबा दिला आणि मदत केली.आज अशा नियोजनाची सुरुवात करत आहे ज्यामुळे अनेक लोकांना फायदा होईल.मला आशा आहे आजवर जसा आपला पाठिंबा राहिला आहे तसाच सर्वांचा पाठिंबा राहिल.
Sourav Ganguly has not resigned as the president of BCCI: Jay Shah, BCCI Secretary to ANI pic.twitter.com/C2O3r550aL
— ANI (@ANI) June 1, 2022
याच ट्विटनंतर गांगुली यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरु झाली. तथापि, याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, गांगुलींचा निर्णय राजकीय असल्याची चर्चा रंगली आहे. कारण बंगाल निवडणुकीपासून नियमितपणे याची चर्चा सुरु झाली आहे.अलीकडेच कोलकातामधील व्हिक्टोरिया मेमोरिअलमध्ये सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गांगुली यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी अमित शहा सौरव गांगुली यांच्या निवासस्थानी सुद्धा गेले होते. दोघांनी सोबत डिनरही केले होते. यावेळी सुवेंदू अधिकारी तसेच अन्य बंगाली भाजप नेते सुद्धा डिनरमध्ये सहभागी झाले होते. तेव्हाही गांगुलींच्या राजकीय प्रवेशाची चर्चा रंगली होती. मात्र, त्यांनी त्यावेळी सीएम ममता यांचे कौतुक करून गुगली टाकली होती.
— Sourav Ganguly (@SGanguly99) June 1, 2022
आज त्यांनी केलेल्या ट्विटने पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे गांगुली यांची भाजपच्या साक्षीने बंगालमध्ये राजकीय इनिंग सुरु होणार का? याची उत्सुकता आहे. बंगालमध्ये भाजपमध्ये राजकीय चेहऱ्याच्या शोधात आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी गांगुली यांच्याकडे भाजप प्रवेशासाठी सातत्याने चाचपणी केली आहे. मात्र,गांगुली प्रत्येकवेळी आपण राजकारणात येणार नसल्याचे सांगितले. मात्र आजच्या घडामोडीने राजकीय प्रवेशाच्या शक्यता वाढल्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- सौरव गांगुली यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडलं, नवी इनिंग सुरु करणार
- भारताच्या माजी क्रिकेटपटूने निवडला T20 World Cup साठी संघ, रोहित-विराटला वगळले