लॉर्ड्स कसोटीआधी सचिनचा विराटला मोलाचा सल्ला
लॉर्डवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी सचिनच्या सल्लामुळे विराटचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे.
लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर टीम इंडिया दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज आहे. कर्णधार विराट कोहली फॉर्ममध्ये असला तरी पराभवानंतर इतर खेळाडूंच्या फॉर्मबाबत तो चिंतीत आहे. अशावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विराट कोहलीला मोलाचा सल्ला दिला आहे.
सचिनने विराटला आपल्या मनाचं ऐकण्याच सल्ला दिला. तसेच फलंदाजीचा फॉर्म कायम ठेवण्याचा सल्लाही सचिनने विराटला दिला. लॉर्डवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी सचिनच्या सल्लामुळे विराटचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे.
"विराटला जे वाटतं तेच त्याने करायलं हवं. विराट चांगल्या फॉर्ममध्ये असून हा फॉर्म त्याने टिकवून ठेवला पाहिजे. आजूबाजूला काय होत आहे याकडे दुर्लक्ष करुन विराटने आपलं लक्ष्य साध्य केलं पाहिजे", असं सचिनने म्हटलं.
सचिन पुढे म्हणाला की, " मी माझ्या अनुभवातून सांगतो की फलंदाजांना कितीही धावा केल्या तरी त्या कमी असतात. विराटसोबत सध्या तेच होतंय. विराटला कितीही धावा केल्या तरी त्या कमी वाटत आहेत. ज्यावेळी तुम्ही समाधानी होता, त्यावेळी तुमचा वाईट काळ सुरू होतो. गोलंदाज केवळ 10 विकेट घेऊ शकतो, मात्र फलंदाज कितीही धावा करु शकतो. त्यामुळे समाधानी न होता धावा करत राहिलं पाहिजे."
पहिल्या कसोटी सामन्यात विराट वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला आपली चमक दाखवता आली नाही. पहिल्या कसोटीत विराटने पहिल्या डावात 149 आणि दुसऱ्या डावात 49 धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर विराटने आयसीसीच्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं.
क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर गुरुवारी इंग्लंड-भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना होत आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंड 1-0ने आघाडीवर आहे.
संबधित बातम्या
इंग्लंडने कसोटी जिंकली, विराटने 'जग' जिंकलं!
टीम इंडियानं एजबॅस्टन कसोटी का गमावली?
पराभवानंतर टीममध्ये बदल करु नको, गांगुलीचा कोहलीला सल्ला
अंगठ्याच्या दुखापतीमुळे बुमराह दुसरी टेस्टही खेळू शकणार नाही