Rohit Sharma: धोनी, कोहली जे करु शकले नाहीत, ते रोहितनं करुन दाखवलं; केला मोठा विक्रम
Ind vs SA T20I : दक्षिण आफ्रिकेसोबतच्या मालिकेत आघाडी घेत रोहित शर्माने मोठा विक्रम केला आहे, जे धोनी, कोहली करू शकले नाहीत ते रोहितनं करून दाखवले.
![Rohit Sharma: धोनी, कोहली जे करु शकले नाहीत, ते रोहितनं करुन दाखवलं; केला मोठा विक्रम Rohit Sharma india vs south Africa IND vs SA T20i Record Latest Updates Rohit Sharma: धोनी, कोहली जे करु शकले नाहीत, ते रोहितनं करुन दाखवलं; केला मोठा विक्रम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/45ebd766fe806ca9e4c90e95cc524dd71663412170672344_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ind vs SA T20I : काल रविवारी रात्री दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) झालेल्या दुसऱ्या T20I सामन्यात भारताने 16 धावांनी विजय मिळवत 2-0 नं मालिका खिशात टाकली आहे. दक्षिण आफ्रिकेसोबतच्या मालिकेत आघाडी घेत रोहित शर्माने मोठा विक्रम केला आहे, जे धोनी, कोहली करू शकले नाहीत ते रोहितनं करून दाखवले. रोहित शर्मा (Rohit Sharma) सलग सर्वाधिक टी-20 मालिका जिंकणारा भारतीय कर्णधार बनला आहे. या बाबतीत त्याने माजी कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे. रोहित शर्माने 2021 च्या T20 विश्वचषकानंतर संघाची धुरा सांभाळली आणि तेव्हापासून संघाने त्याच्या नेतृत्वाखाली एकही T20 मालिका गमावलेली नाही. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने सलग 11वी मालिका जिंकली. याआधी सलग सर्वाधिक टी-20 मालिका जिंकण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 10 टी-20 मालिका जिंकल्या.
वास्तविक, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर टी-20मध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही. भारताने यापूर्वी कधीही दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत हरवले नव्हते. पण रोहित शर्माने रविवारी हा दुष्काळ संपवला आणि भारताला पहिला विजय मिळवून दिला.
2015 मध्ये प्रथमच दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्यावर टी-20 मालिका खेळली होती. त्यादरम्यान धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने मालिका 0-2 ने गमावली होती. यानंतर, 2019 आणि 2022 मध्ये दोन मालिका खेळल्या गेल्या आणि या दोन्ही मालिका अनिर्णित राहिल्या. 2019 मध्ये कोहलीच्या नेतृत्वाखाली 2 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत संपली. त्याच वर्षी 5 सामन्यांची T20 मालिका 2-2 ने अशी बरोबरीत राहिली. मालिकेतील एक सामना पावसामुळे वाहून गेला होता. या मालिकेत ऋषभ पंत भारताचा कर्णधार होता.
400 T20 सामने खेळणारा पहिला भारतीय
कर्णधार रोहित शर्मा 400 टी 20 सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. यामध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यासह लीग सामन्यांचाही समावेश आहे. रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी 191, भारतासाठी 141, डेक्कन चार्जर्स 47 सामने खेळले आहेत. त्याशिवाय मुंबईसाठी 17 आणि इंडियंस आणि इंडिया-एसाठी दोन दोन सामने खेळले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
टीम इंडियाची गाडी सुसाट, दक्षिण आफ्रिकाविरोधात मायदेशातील पहिल्यांदाच टी 20 मालिका जिंकली
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)