एक्स्प्लोर
Advertisement
Ind vs SA 2nd T20 Result : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 16 धावांनी विजय, 2-0 ची विजयी आघाडी घेत मालिकाही घातली खिशात
IND vs SA : भारताने हा सामना जिंकल्यामुळे तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 ची विजयी आघाडी घेत मालिकाही खिशात घातली आहे. भारताने प्रथमच दक्षिण आफ्रिकेवर घरच्या मैदानात मालिकाविजय मिळवला आहे.
IND vs SA Highlights : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी20 मध्ये भारत 16 धावांनी जिंकला आहे. आधी फलंदाजी करत भारताने 237 धावांचा डोंगर उभारत दक्षिण आफ्रिकेसमोर 238 धाावंचे आव्हान ठेवलं. पण दक्षिण आफ्रिकेच्या डी कॉक आणि मिलर जोडीने अप्रतिम खेळ दाखवत कडवी झुंज दिली. पण दक्षिण आफ्रिका 20 षटकांत 221 धावाच करु शकल्याने भारत 16 धावांनी सामना जिंकला आहे.
सामन्यात सर्वप्रथम दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला कमी धावांत रोखून निर्धारीत लक्ष्य लवकर पूर्ण करण्याचा त्यांचा डाव होता. पण हा डाव भारतीय फलंदाजांनी उधळून लावला. सुरुवातीपासूनच भारताने तुफान फलंदाजी केली. सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी तडाखेबाज फलंदाजी करत अगदी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. पण नंतर रोहित 43 धावा करुन तर केएल राहुल अर्धशतक पूर्ण करुन 57 धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमारने नावाला साजेशी 61 धावांची तडफदार खेळी केली. तर विराट कोहली 49 धावांवर नाबाद राहिला. कार्तिकनेही नाबाद 17 धावा करत भारताची धावसंख्या 237 पर्यंत पोहोचवली. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 20 षटकांत 238 धावा करायच्या होत्या.
238 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली त्यांचे सुरुवातीचे दोन फलंदाज स्वस्तात माघारी परतले. पण इतर फलंदाजांनी कडवी झुंज दिली. यावेळी डेविड मिलरनं 106 धावा ठोकल्या तर डी कॉकनंही 69 धावांची तुफानी खेळी केली. पण अवघ्या 16 धावा कमी पडल्याने दक्षिण आफ्रिकेला सामना गमवावा लागला.
सूर्यासह विराटनं रचला इतिहास
सामन्यात भारताकडून दमदार खेळी करणाऱ्या सूर्यकुमार आणि विराट कोहलीने नवे रेकॉर्ड नावावर केले आहेत. यावेळी कोहलीने ताबडतोड 49 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान विराट कोहलीनं मोठ्या विक्रमाला गणवसणी घातली आहे. विराट कोहलीनं टी 20 क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा पल्ला पार केला आहे. असा पराक्रम करणारा विराट कोहली पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यानेही एक भीमपराक्रम केला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत म्हणजेच 543 चेंडूत 1000 धावा पूर्ण केल्या आहेत.
हे देखील वाचा -
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement