एक्स्प्लोर

फेडररवर 36 लाखांची पैज लावणाऱ्या चाहत्याला 1.19 कोटी

ग्रासकोर्टचा बादशाह रॉजर फेडरर विम्बल्डन पुरुष एकेरीच्या अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा लाखो चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं त्याच्या डोक्यावर होतं. पुरुष एकेरीत आठवं विम्बल्डन जेतेपद पटकावून फेडररने विक्रम रचला आहे. फेडररच्या या विजयामुळे त्याचा एक चाहता चांगलाच मालामाल झाला आहे.

मुंबई : ग्रासकोर्टचा बादशाह रॉजर फेडरर विम्बल्डन पुरुष एकेरीच्या अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा लाखो चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं त्याच्या डोक्यावर होतं. पुरुष एकेरीत आठवं विम्बल्डन जेतेपद पटकावून फेडररने विक्रम रचला आहे. फेडररच्या या विजयामुळे त्याचा एक चाहता चांगलाच मालामाल झाला आहे. फेडररच जिंकणार या विश्वासाने त्याच्यावर तब्बल 50 हजार युरो म्हणजे सुमारे 36 लाख रुपयांची पैज लावणाऱ्या चाहत्याला घसघशीत रक्कम मिळाली आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या जॉर्जला 36 लाखांची पैज जिंकल्यामुळे 1 लाख 62 हजार युरो म्हणजेच 1 कोटी 19 लाख 41 हजार रुपये मिळाले आहेत. जॉर्ज हा एका टेक कंपनीचा हेड आहे. फेडररने विम्बल्डनची ट्रॉफी आठव्यांदा उचलावी यासाठी त्याने देव पाण्यात ठेवले होते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या रकमेची पैज लावल्याचं त्याने आपल्या गर्लफ्रेण्डलाही सांगितलेलं नव्हतं.

फेडररने सॅम्प्रसचा रेकॉर्ड मोडला, आठव्यांदा विम्बल्डनचं जेतेपद

'माझी गर्लफ्रेण्ड फारशी टेनिस पाहत नाही. त्यामुळे तिला याची कल्पना दिलेली नाही. मी फारशा पैजा लावत नाही. पण जेव्हा बेट लावतो, तेव्हा ती जिंकेन याची खात्री असेल तरच. खरं तर आम्ही मित्र जमलो होतो. तेव्हा फेडररची खेळी पाहून माझी खात्री पटली की हा यंदाचं विम्बल्डन जेतेपद पटकावणारच.' असं जॉर्ज मॅचपूर्वी म्हणाला होता. या मोसमात फेडररने तीन विजेतेपदं मिळवल्यामुळे जॉर्जचा आत्मविश्वास दुणावला होता. ग्रासकोर्टचा बादशाह अशी बिरुदावली मिरवणाऱ्या रॉजर फेडररने विम्बल्डनच्या अखेरच्या फेरीत आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावली आहे. विम्बल्डनमध्ये पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये क्रोएशियाच्या मरिन सिलिचवर मात करुन फेडररने आठव्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. हे जेतेपद पटकावून फेडररने विम्बल्डन स्पर्धेचा ताज सर्वाधिक वेळा मिळवण्याचा विक्रम रचला आहेे. यापूर्वी पीट सॅम्प्रसच्या सात वेळा विम्बल्डन जिंकण्याच्या विक्रमाशी फेडररने बरोबरी केली होती. मात्र आठवं विजेतेपद पटकावून त्याने सॅम्प्रसचा विक्रम मोडित काढला आहे. फेडररने अकराव्यांदा विम्बल्डनची फायनल गाठली आहे. 2012 नंतर पाच वर्षांनी त्याला विम्बल्डनचं जेतेपद मिळालं आहे. फेडरर खेळत असलेली ही 29 वी ग्रँडस्लॅम फायनल आहे. विम्बल्डनची अंतिम फेरी खेळणारा फेडरर हा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. फेडरर 35 वर्षांचा आहे. यापूर्वी केन रोसवेलने 39 व्या वर्षी विम्बल्डनची फायनल खेळली होती.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
Amol Mitkari on Ajit Pawar CM: मोठी बातमी : पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
Maharashtra CM: पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
Amol Mitkari on Ajit Pawar CM: मोठी बातमी : पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
Maharashtra CM: पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
Bollywood Actor Struggle Life: ना हीरो ना विलन, इंडस्ट्रीचा असा दिग्गज ज्यानं 70 वर्षांच्या करिअरमध्ये धर्मेंद्र-बिग बींनाही पाजलं पाणी; आज मुलंही सुपरस्टार
ना हीरो ना विलन, इंडस्ट्रीचा असा दिग्गज ज्यानं 70 वर्षांच्या करिअरमध्ये धर्मेंद्र-बिग बींनाही पाजलं पाणी; आज मुलंही सुपरस्टार
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
Embed widget