एक्स्प्लोर

Ricky Ponting On Warner-Jonson Controversy : 'त्या दोघांना एका खोलीत बोलवा आणि...' ऑस्ट्रेलियन संघाच्या 'महाभारतात' आता रिकी पॉन्टिंगची थेड उडी!

Ricky Ponting On Warner Jonson Controversy : पॉन्टिंगने वॉर्नर आणि जॉन्सनला एका खोलीत बसवून चर्चेद्वारे प्रकरण मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Ricky Ponting On Warner-Jonson Controversy : मिचेल जॉन्सनने डेव्हिड वॉर्नरवर केलेल्या सडकून टीकेनंतर ऑस्ट्रेलियासह मीडियामध्येही चांगलीच खळबळ उडाली आहे. आता माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सची एकापाठोपाठ एक विधाने समोर येत आहेत. ताजे नाव आहे ते ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचे. या दिग्गज खेळाडूने आता माध्यमांमध्ये हे प्रकरण पुढे येऊ नये यासाठी उपाय सुचवला आहे. त्याने वॉर्नर आणि जॉन्सनला एका खोलीत बसवून चर्चेद्वारे प्रकरण मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

दोघांनीही एकमेकांशी बोलून हा मुद्दा शांत करावा

सनरायझर्सशी बोलताना पॉन्टिंग म्हणाला की, 'मला आता या दोन लोकांमध्ये यावे लागेल. या दोघांना एका खोलीत आणण्यासाठी मी मध्यस्थ असणे आवश्यक आहे असे दिसते. माध्यमांमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्याऐवजी दोघांनीही एकमेकांशी बोलून हा मुद्दा शांत करावा. पाँटिंग म्हणतो, 'हे दोन्ही लोक खूप संतापले आहेत आणि आम्हाला माहित आहे की हे प्रकरण 6 ते 8 महिने जुने आहे. अॅशेस मालिकेसाठी निवडीच्या वेळी हा वाद सुरू झाला. हे असेच चालू राहिले कारण दोघेही समोरासमोर बसून त्यावर बोलले नाहीत. हे आता घडावे अशी माझी इच्छा आहे.

कलंक लावणाऱ्यांना कसला निरोप देता? तो हिरो आहे का??

डेव्हिड वॉर्नरने कसोटी सामन्यांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 14 डिसेंबरपासून पाकिस्तानविरुद्ध सुरू होणारी तीन सामन्यांची मालिका ही त्याची शेवटची कसोटी मालिका आहे. याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज मिचेल जॉन्सनने (Mitchell Johnson on David Warner) एका लेखाद्वारे वॉर्नरवर निशाणा साधला होता. त्याने लिहिले होते की, सॅन्ड पेपर प्रकरणात दोषी ठरलेल्या वॉर्नरला सन्माननीय नायकाचा निरोप का मिळत आहे? जॉन्सनने असेही लिहिले की, खराब फॉर्म असूनही वॉर्नरला कसोटी संघात का स्थान देण्यात आले? जॉन्सनच्या या वक्तव्यानंतर हे प्रकरण अजून तापले आहे.

मिशेल जाॅन्सनने फक्त डेव्हिड वॉर्नरवर टीका केली नाही, तर ऑस्ट्रेलियाच्या मुख्य निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांच्यावरही प्रहार केला. ज्या खेळाडूने ऑस्ट्रेलियाचे नाव बदनाम केले होते, त्याच खेळाडूला आता नायक म्हणून निरोप दिला जात असल्याचा घणाघाती हल्ला मिचेल जॉन्सनने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर वॉर्नरवर चढवला. बॉल टॅम्परिंग प्रकरणात डेव्हिड वॉर्नर दोषी आढळला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget