एक्स्प्लोर

दिल्लीचा राजस्थानवर 46 धावांनी 'रॉयल' विजय; पॉइंट टेबलमध्ये दिल्ली नंबर 1

IPL 2020, RR vs DC : दिल्लीने या हंगामात शानदार कामगिरी करत 5 पैकी 4 सामने जिंकत गुणतालिकेत प्रथम स्थान मजबूत केलंय. दिल्लीला केवळ 1 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सची कामगिरी खराब राहिली आहे. राजस्थानने आतापर्यंत 5 पैकी केवळ 2 सामने जिंकले आहेत आणि शेवटचे 3 सामने गमावले आहेत.

IPL 2020 DC vs RR: आयपीएलमध्ये आज दिल्लीने राजस्थानवर 'रॉयल' विजय मिळवत गुणतालिकेत प्रथम स्थान मिळवलं आहे. दिल्ली कॅपिटल्सने दिलेलं 185 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ 19.4 षटकात 138 धावांवर आटोपला.

दिल्लीचं 185 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरुवात चांगली झाली. सलामीला आलेले यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी सुरुवातीला काही फटके मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, यशस्वी जयस्वाल 34 धावांवर तर बटलर 13 धावांवर माघारी परतले. त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, तोही 24 धावांवर बाद झाला. त्यानंतर राहुल तेवातिया वगळता कोणालाही दोन अंकी धावसंख्या उभारता आली नाही. दिल्लीकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक तीन गडी बाद केले. रविचंद्रन अश्विन आणि मार्कस स्टोइनीस यांनी प्रत्येकी दोन तर ऑनरीच नॉर्टजे, हर्षल पटेल आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक गडी बाद केला. विशेष म्हणजे आज दिल्लीच्या प्रत्येक गोलंदाजाने विकेट काढली.

IPL 2020 : आयपीएलमधील रेकॉर्ड किंग डेविड वॉर्नर; कोहली-रोहितलाही टाकलं मागे

राजस्थानविरूद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने 20 षटकांत 184 धावांचे लक्ष्य उभारले. सुरुवातीला लवकर खराब सुरुवात झाल्यानंतरही शिमरॉन हेटमायर आणि मार्कस स्टॉयनीस या दोन फलंदाजींनी चांगली खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.

तत्पूर्वी, दिल्लीची सुरुवात अडखळत झाली. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ हे दोघेही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. आर्चरने धवनला 5 धावांवर तर पृथ्वी शॉला 19 धावांवर माघारी धाडले. सलामीवीर बाद झाल्यावर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर डाव सावरतील असं वाटत असताना अय्यर 17 चेंडूत 22 धावा काढून बाद झाला. अय्यर बाद झाल्यानंतर ऋषभ पंतदेखील लगेचच धावबाद झाला. त्यानंतर मार्कस स्टॉयनीसने धमाकेदार खेळी केली. त्याने 4 षटकारांसह 30 चेंडूत 39 धावा जमवल्या. तर शिमरॉन हेटमायरनेही तुफान फलंदाजी केली. त्याने 24 चेंडूत 5 षटकारांच्या सहाय्यने 45 धावा केल्या. त्यानंतर अक्षर पटेलने शेवटी येऊन फटकेबाजी केली. अक्षरने 8 चेंडूत 17 धावांची खेळी करत संघाला 180 उभारण्यात मदत केली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने टिच्चून गोलंदाजी करत केवळ 24 धावा देत 3 गडी बाद केले. तर कार्तिक त्यागी, अँड्र्यू टाई आणि राहुल तेवातिया यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget