IPL 2020 : आयपीएलमधील रेकॉर्ड किंग डेविड वॉर्नर; कोहली-रोहितलाही टाकलं मागे
IPL 2020 : डेविड वॉर्नरने आपल्या आयपीएल करियरमध्ये एकूण 46 अर्धशतकं फटकावली. त्याचसोबत डेविड वॉर्नर हा आयपीएलच्या इतिहासातील एकमेव असा फलंदाज आहे. ज्याच्या नावे 50 हून अधिक वेळा फिफ्टी प्लस स्कोअर करण्याचा रेकॉर्ड आहे.
IPL 2020 : सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने आयपीएल 2020 मध्ये सलग दुसरं अर्धशतक फटकावलं आहे. किंग्स इलेव्हन पंजाबच्या विरोधात त्याने गुरुवारी 40 चेंडूंमध्ये 52 धावा काढल्या. त्याचसोबत वॉर्नरने आयपीएलमधील 4900 धावा पूर्ण केल्या. वॉर्नरने आपल्या आयपीएल करियरमध्ये एकूण 46 अर्धशतकं फटकावली. त्याचसोबत डेविड वॉर्नर हा आयपीएलच्या इतिहासातील एकमेव असा फलंदाज आहे. ज्याच्या नावे 50 हून अधिक वेळा फिफ्टी प्लस स्कोअर करण्याचा रेकॉर्ड आहे. वॉर्नरने चार वेळा आयपीएलमध्ये शतकी खेळी केली आहे.
प्रत्येक तिसर्या डावात 50 धावा
वॉर्नर आयपीएलच्या 132 सामन्यांमध्ये 17 वेळा नाबाद राहिला असून आतापर्यंत त्याने 4933 धावा केल्या आहेत. त्यांची सरासरी 42.89 आहे. आणि स्ट्राइक रेट 141.46 आहे. त्याने 46 फिफ्टी आणि चार सेंच्युरी पूर्ण केल्या आहेत. वॉर्नर आयपीएलच्या सरासरी 2.67 डावांत अर्धशतकी खेळी करतो.
वॉर्नरनंतर विराट कोहलीचा क्रमांक लागतो. कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 42 वेळा 50 प्लस धावा केल्या आहेत. त्यासाठी कोहलीने 182 सामने खेळले आहेत. कोहली आयपीएलच्या सरासरी 4.33 डावांमध्ये 50 किंवा त्याहून जास्त धावा करतो. सुरेश रैना आणि रोहित शर्माने आतापर्यंत आयपीएलमध्ये 39 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत. रैना सरासरी 4.49 डावांत तर रोहित 4.33 डावांत 50 किंवा त्यापेक्षा जास्त स्कोअर करतो. सुरेश रैना आणि रोहित शर्माने आतापर्यंत आयपीएलमध्ये 39 वेळा 50 हून अधिक धावा काढल्या आहेत. रैना सरासरी 4.94 डावांत तर रोहित प्रत्येक 4.97 डावांत अर्धशतक पूर्ण करतो. याव्यतिरिक्त एबी डिविलियर्सने 38 वेळा तर शिखर धवनने 37 वेळा आयपीएलमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावा फटकावल्या आहेत.
वॉर्नरनंतर गेल सर्वात विश्वासार्ह फलंदाज
क्रिस गेल या आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या टीममध्ये आहे. परंतु, आतापर्यंत त्याने एकही सामना खेळलेला नाही. जर सतत उत्तम कामगिरीबाबत बोलायचं झालं तर, डेविड वॉर्नरनंतर क्रिस गेलचाच नंबर येतो. गेलने आयपीएलमध्ये सरासरी 3.67 डावांमध्ये 50 किंवा त्याहून अधिक स्कोअर केला आहे. 125 आयपीएल सामन्यांत गेलच्या नावावर 4484 धावा केल्या आहेत. त्याने 6 शतक आणि 28 अर्धशतकं फटकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :