Pro Kabaddi League 2021 : चुरशीच्या सामन्यात युपी योद्धा संघ विजयी, पाटणा पायरेट्सला एका पॉईंटने दिली मात
Pro Kabaddi League 2021 : पाटणा पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात युपीच्या संघाने पाटणा संघावर विजय मिळवला आहे.
Pro Kabaddi League 2021 : भारताच्या मातीतील खेळ कबड्डीच्या प्रो कबड्डी लीगला (Pro Kabaddi League 2021) सुरुवात झाली आहे. सर्वच सामने चुरशीचे होत असून नुकत्याच झालेल्या पाटणा पायरेट्स (Patna Pirates) विरुद्ध यूपी योद्धा (UP Yoddha) सामन्यातही अगदी चुरशीचा खेळ पाहायला मिळाला. अखेर युपीच्या संघाने पाटणाच्या संघावर 36-35 अशा फरकाने विजय मिळवला. त्यामुळे या सामन्यात कबड्डीचा रोमांच सर्वांनीच अनुभवला.
कबड्डी सुपरस्टार प्रदीप नरवालने (Pradeep Narwal) युपी संघाकडून खेळताना यूपीचा 12 गुण घेत सर्वात भारी कामगिरी केली. त्यामुळे त्यालाच सुपर रेडरचा (Super Raider) मान देण्यात आला. दरम्यान दोन्ही संघानी सामन्यात उत्तम खेळ दाखवला. थोडक्यात पराभूत झालेल्या पाटणा संघाने देखील उत्तम डिफेन्स दाखवला, पण अखेर एका गुणाच्या फरकाने त्यांचा पराभव झाला.
आतापर्यंत युपी विरुद्ध पाटणा
युपी योद्धा (UP Yoddha) आणि पाटणा पायरेट्स (Patna Pirates) हे संघ आतापर्यंत आठ वेळा समोरा-समोर आले आहेत. दरम्यान आजच्या या विजयासह युपीने पाटणा संघाविरुद्ध (UP Yoddha vs Patna Pirats) तिसरा विजय मिळवला आहे. तर पाटणाने आतापर्यंत चार वेळा युपी संघाला मात दिली आहे. दरम्यान एक सामना अनिर्णीतही सुटला आहे.
हे ही वाचा -
- PKL 2021: प्रो कबड्डी लीगला 22 डिसेंबरपासून सुरुवात; कोणत्या संघानं जिंकली सर्वाधिक विजेतेपदे? पाहा यादी
- Pro Kabaddi League : पाटना पायरेट्सचा सनसनाटी विजय, अखेरच्या क्षणी हरियाणा स्टीलर्सचा पराभव
- Pro Kabaddi League : अभिषेक बच्चनच्या जयपुर पिंक पँथर्सला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का, गुजरात जायंट्सची बाजी
- Pro Kabaddi League : रोमाचंक सामन्यात दबंग दिल्लीची पुणेरी पलटणवर मात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha