एक्स्प्लोर
Pro Kabaddi League 2018 : घरच्या मैदानात गुजरात दिल्लीकडून पराभूत
आजपर्यंतच्या प्रत्येक सामन्यात गुजरातच्या संघाने घरच्या मैदानावर सहज विजय मिळवले होते. परंतु या सामन्यात सुरुवातीपासूनच दबंग दिल्लीने गुजरातवर वर्चस्व मिळवलं.

अहमदाबाद : प्रो कबड्डी लीगमध्ये दिल्ली आणि यजमान गुजरातमध्ये शानदार सामना पाहायला मिळाला. या सामन्यात शेवटपर्यंत दिल्ली संघाचं पारडं गुजरातपेक्षा जड दिसलं. अखेर दबंग दिल्लीने गुजरात फॉर्च्युनजायंट्स संघाला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत करत इतिहास रचला. दबंग दिल्लीने हा सामना 29-26 असा जिंकला. आजपर्यंतच्या प्रत्येक सामन्यात गुजरातच्या संघाने घरच्या मैदानावर सहज विजय मिळवले होते. परंतु या सामन्यात सुरुवातीपासूनच दबंग दिल्लीने गुजरातवर वर्चस्व मिळवलं. अखेरच्या मिनिटापर्यंत स्कोअर बरोबरीत होता आणि दोन्ही संघ आघाडीसाठी प्रयत्न करत होते. मात्र दिल्लीने गुजरातवर रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यात दिल्लीकडून मेराज शेखने शानदार कामगिरी केली. त्याने 12 रेडमध्ये 6 पॉईंट्सची कमाई केली. तर रविंदर पहल 5 टॅकलमध्ये 4 पॉईंटसह टॉप डिफेंडर ठरला. दुसरीकडे गुजरातकडून सचिनने 16 रेड मध्ये 7 पॉईंट्स मिळवले, तर प्रवेशने 5 टॅकलमध्ये 6 पॉईंट्सची कमाई केली. दबंग दिल्लीला या सामन्यात 12 रेड पॉईंट्स, 13 टॅकल पॉईंट्स, 2 ऑलआऊट पॉईंट्स आणि 2 एक्स्ट्रा पॉईंट्स मिळाले. तर गुजरातला 13 रेड पॉईंट्स, 12 टॅकल पॉईंट्स आणि 1 एक्स्ट्रा पॉईंट्स मिळाले.
आणखी वाचा























