PKL 9: रोमांचक सामन्यात यू मुंबाचा विजय; अखेरच्या रेडमध्ये हरियाणा स्टीलर्सला हरवलं
Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डी लीगच्या (PKL 9) 30 व्या सामन्यात यू मुंबानं (U Mumba) हरियाणा स्टीलर्सचा (Haryana Steelers) अवघ्या एका पॉईंट्सनं मात दिली. अतिशय
Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डी लीगच्या (PKL 9) 30 व्या सामन्यात यू मुंबानं (U Mumba) हरियाणा स्टीलर्सचा (Haryana Steelers) अवघ्या एका पॉईंट्सनं मात दिली. अतिशय रोमांचक ठरलेल्या या सामन्यात यू मुंबानं 32-31 असा विजय मिळवला. अखेरच्या रेडमध्ये हरियाणाच्या संघाकडून चूक झाली आणि त्याचा फायदा घेत मुम्बानं विजय मिळवला. हरियाणाचा हा सलग तिसरा पराभव आहे.
ट्विट-
#MUMvHS had us on the edge of our seats 🥶
— ProKabaddi (@ProKabaddi) October 21, 2022
But @umumba made sure it was their night to cherish 😌#vivoProKabaddi #FantasticPanga pic.twitter.com/l9NxmRBtxA
सहा मिनिटांत ऑल आऊट होऊनही हरियाणाचा दमदार खेळ
सामन्याच्या सुरुवातीलाच यू मुंबाचं वर्चस्व पाहायला मिळालं. सहाव्या मिनिटाला हरियाणाला ऑलआऊट करत यू मुंबानं सहा पॉईंट्सची आघाडी घेतली. ऑलआऊट होऊनही हरियाणानं मुंबाला मोठी आघाडी घेऊ दिली नाही. पहिल्या हाफमध्ये यू मुंबा आणि हरियाणा स्टीलर्स यांचे जवळपास समान पॉईंट्स होते. रेडमध्ये हरियाणाच्या मीतू आणि मुंबाच्या गुमान सिंहला प्रत्येकी चार गुण मिळाले. डिफेंडमध्ये सुरेंदर सिंहनं मुंबासाठी तीन टॅकल पॉईंट घेतले. तर, हरियाणाच्या मोहित नंदलच्या खात्यातही तीन टॅकल पाईंट जमा झाले.
अखेरच्या रेडमध्ये मुंबईचा विजय
दुसऱ्या हाफमध्येही मुंबाचा जोर दिसून आला. यू मुंबानं सहाव्या मिनिटात हरियाणाला दुसऱ्यांदा ऑल आऊट करून आठ पॉईंट्सची आघाडी घेतली. पुन्हा ऑल आऊट झाल्यानंतर हरियाणानं पुन्हा दमदार कामगिरी करत सात मिनिटांनी मुंबाला ऑल आऊट करत प्रथमच सामन्यात आघाडी घेतली. या आघाडीनंतर हरियाणानं आपला खेळ उत्कृष्ट राखला, पण मुंबानेही त्यांची आघाडी वाढू दिली नाही. मुंबानं सातत्यपूर्ण प्रयत्न करत अखेरच्या क्षणी एका गुणाची आघाडी घेतली आणि हा सामना आपल्या नावावर केला.
हे देखील वाचा-