IND vs PAK, Weather Report : भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्याचा उत्साह शिगेला, पण पाऊस व्यत्यय आणणार? कशी असेल हवामानाची स्थिती?
T20 World Cup 2022: भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी विश्वचषकातील महामुकाबला रंगणार असून याआधी दोन्ही संघच नाही अवघं क्रिकेट विश्व उत्साहीत दिसत आहे.
IND vs PAK, T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेला ऑस्ट्रेलियात सुरुवात झाली असून स्पर्धेतील महामुकाबला 23 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात रंगणार आहे. मेलबर्नच्या मैदानावर (melbourne cricket ground) होणाऱ्या या सामन्यासाठी अवघं क्रिकेट जगत उत्सुक असताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे 'पावसाचा व्यत्यय'. मेलबर्नच्या क्रिकेट मैदानात सामन्यादिवशी तब्बल 70 टक्के पावसाची शक्यता असल्याने सामन्यावर पावसाचं संकट घोंगावत आहे. पावसाच्या या शक्यतेमुळे सामना होणार का? आणि झाल्यास किती ओव्हर्सचा होणार ही चिंता सर्वांना सतावत आहे.
समोर आलेल्या या माहितीनंतर आता भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामन्याची मजा पावसामुळे खराब होऊ शकते. रविवारी 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमध्ये पावसाचा अंदाज (melbourne weather) हवामानाची माहिती देणाऱ्या संकेतस्थळांनी वर्तविला आहे. मेलबर्नमध्ये पावसाची 70 टक्के शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये निराशा आली आहे. मेलबर्नमध्ये (melbourne) पावसाचा सामना करण्याकरता ड्रेनेजसाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे, जेणेकरून पावसाचा सामना करता येईल. त्यामुळे हलका हलका पाऊस पडला तर सामना खेळवला जाऊ शकतो. पण पाऊस अधिक झाल्यास सामना रद्द होऊ शकतो.
पावसाने सामना रद्द झाल्यास काय?
टी20 विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे जर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला आणि सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना गुण वाटून दिले जातील.
सुपर 12 कम्प्लिट
सुपर 12 मध्ये आधी असणारे 8 संघ आणि काल ग्रुप A मधून गेलेल्या श्रीलंका आणि नेदरलँड या दोन संघानंतर अजून 2 संघाची जागा मोकळी होती. ज्यामध्ये ग्रुप B मधून आयर्लंड आणि झिम्बाब्वे हे दोन संघ गेले असून त्यामुळे सुपर 12 चे सर्व संघ आता आपल्यासमोर आले आहेत. उद्यापासून सुपर 12 चे सामना रंगणार आहेत.
हे देखील वाचा-