Viral Video: पाकिस्तानची 'ही' मुलगी आता शुभमन गिलच्या प्रेमात; 'अशी' दिली प्रेमाची कबुली, पाहा व्हिडीओ
Pakistani Viral Girl: भारत-पाक मॅचच्या दरम्यान स्वत:ला विराट कोहलीची फॅन म्हणवणारी पाकिस्तानची मुलगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने शुभमन गिल सोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Pakistani Viral Girl: आशिया कपमध्ये भारताने (India) आपल्या अतुलनीय कामगिरीने क्रिकेटचा बादशाह कोण? हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करुन भारताने ही ट्रॉफी जिंकली. पण असंख्य क्रिकेट फॅन्स पाकिस्तान विरुद्ध भारताची फायनल मॅच पाहू इच्छित होते, पण तसं झालं नाही. पाकिस्तानची व्हायरल गर्ल आणि विराट कोहलीची फॅन देखील पाकिस्तान आणि भारताला फायनलमध्ये बघू इच्छित होती.
तरी या पाकिस्तानच्या मुलीने श्रीलंकेविरुद्धच्या फायनल सामन्यात भारताला पाठिंबा दर्शवला. यावेळी या मुलीने ती शुभमन गिलची फॅन असल्याचं म्हटलं आहे. जेव्हा या पाकिस्तानच्या मुलीला शुभमन हॉटेलमध्ये एन्ट्री करताना दिसला, त्यावेळी तिने त्याच्यासोबत व्हिडीओ बनवला, जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
पाकिस्तानसोबतच्या सामन्यानंतर व्हिडीओ व्हायरल
आशिया कप पाहण्यासाठी पाकिस्तानहून श्रीलंकेला पोहोचलेली मुलगी भारत आणि भारतीय क्रिकेटर्सची खूप मोठी फॅन आहे. तिच्या इन्स्टाग्राम पेजवर तिने भारताना सपोर्ट करण्यासाठी बनवलेले बरेच व्हिडीओ मिळतील. भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या सामन्यावेळी या मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात ती विराट कोहलीची फॅन असल्याचं सांगत होती. यावेळी तिने एका गालावर भारताचा झेंडा, तर दुसऱ्या गालावर पाकिस्तानचा झेंडा बनवला होता. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.
शुभमन गिलसोबत देखील बनवली रील
आता या पाकिस्तानी व्हायरल गर्लने भारताला विजयानंतर शुभेच्छा दिल्या आहेत. तिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शुभमन गिलचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शुभमन गिल हॉटेलमध्ये प्रवेश करत आहे, तर ही पाकिस्तानी मुलगी एन्ट्री गेटवरच उभी आहे. जसा शुभमन प्रवेश करतो तशी ही मुलगी त्याच्यासोबत व्हिडीओ बनवते. हा व्हिडीओ पोस्ट करुन त्या मुलीने त्यावर 'दिल में है प्यार तेरा होंठों पे गितवा...' हे गाणं ठेवलं आहे.
View this post on Instagram
'शुभमन गिल खूप क्यूट आहे'
याशिवाय लव खानी नावाने तयार केलेल्या पेजवर या मुलीने शुभमन गिलसोबतचा स्वतःचा फोटोही पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ही व्हायरल मुलगी म्हणते की, तिने शुभमन गिलसोबत संवाद साधला. शुभमन गिल खूप डाउन टू अर्थ आणि खूप क्यूट आहे, असं ती म्हणते.
View this post on Instagram
हेही वाचा: