एक्स्प्लोर

Pakistan Cricket Team : बाबर आणि कंपनी रिकाम्या हाताने पाकिस्तानमध्ये पोहोचताच भूकंप झालाच! डायरेक्ट पहिला राजीनामा आला

Pakistan Cricket Team : पाकिस्तान संघाने या विश्वचषकात साखळी टप्प्यात 9 सामने खेळले, चार जिंकले आणि पाच गमावले. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानचा संघ 5 सामने हरला आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan Crickt Team) विश्वचषक 2023 मधून बाहेर पडला आहे. बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखालील पाकिस्तान इंग्लंडविरुद्धचा शेवटचा साखळी सामना गमावल्यानंतर अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडला. विश्वचषकात पाकिस्तानकडून अत्यंत खराब कामगिरी पाहायला मिळाली. पाकिस्तानच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी संघाच्या खराब कामगिरीसाठी बाबर आझमला जबाबदार धरले. संघाचे माजी दिग्गज खेळाडू रमीझ राजा सुद्धा चांगलेच संतापले आहेत. 

बाबर आझमची विकेट पडणार, अशी चर्चा सुरु असतानाच ... 

या सर्व पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट टीम मायदेशात परतली. मायदेशात परतल्यानंतर पाकिस्तान संघात राजीनामास्त्र सुरु झालं आहे. बाबर आझमची विकेट पडणार, अशी चर्चा सुरु असतानाच आता थेट गोलंदाजी प्रशिक्षकांनी थेट राजीनामा दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्नी माॅर्केल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांची पुरती धुलाई वर्ल्डकपमध्ये झाली. हॅरिस रौफ वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला. शाहीन आफ्रिदीची सुद्धा धुलाई झाली. पाकिस्तानची वेगवान गोलंदाजी अनेक विरोधी संघानी फोडून काढली होती. त्यामुळे पाकिस्तान संघाला किंमत मोजावी लागली आहे. 

रमीझ राजांकडून बाबरची पाठराखण 

दरम्यान, माजी क्रिकेटर रमीझ राजा यांनी कर्णधार बाबर आझमची पाठराखण केली आहे. ते म्हणाले की, जर खेळाडू चांगली कामगिरी करत नसतील तर बाबर आझम यात काय करू शकतो? पाकिस्तानच्या या माजी खेळाडूने त्याच्या 'रमीझ स्पीक्स' या यूट्यूब चॅनलवर प्रतिक्रिया दिली. रमीझ राजा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि व्यवस्थेवर प्रचंड संताप व्यक्त करताना दिसून आले.

ते म्हणाले की, “जेव्हा तुम्ही नवीन चेंडू घेऊन बाद होणार नाही, जेव्हा तुम्ही महागडे ठराल, तेव्हा बाबर आझमसारखा काय कॅप्टनसी करेल? ते पुन्हा काही क्रिकेटपटूंना बोलावून मेळावा घेतील आणि म्हणतील की, तोडगा कसा काढायचा? मग त्यांना क्रिकेट बोर्डात का ठेवले? त्यांचे एकच काम आहे की, गोंधळ घालणे आणि कर्णधार बदलणे, कोचिंग स्टाफ बदलणे, त्यांना समजेल की आम्ही एक मोठे पाऊल उचलले आहे आणि आता सर्वकाही ठीक होईल. ते गैरसमजाखाली आहेत.” ते पुढे म्हणाले की, “जोपर्यंत तुम्हाला क्रिकेटवर प्रेम नाही, तुमच्यात आवड नाही, तोपर्यंत पाकिस्तानचे क्रिकेट एक इंचही सुधारू शकत नाही. स्वतःला बदलावे लागेल त्यानंतर क्रिकेट बोर्डाने बाबर आझमचे संभाषण लीक केले. चीफ सिलेक्टरने बाबर आणि रिझवानविरोधात विषाची पेरणी केली आहे.”

दुसरीकडे, पाकिस्तान संघ बाहेर पडल्यानंतर माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने संघाच्या खराब कामगिरीसाठी बाबर आझमला जबाबदार धरत नाराजी व्यक्त केली आहे.

कर्णधार एकटा सामने खेळत नाही 

पाकिस्तानच्या स्पोर्ट्स चॅनल 'ए स्पोर्ट्स'शी बोलताना अक्रम म्हणाला, कर्णधार एकटा सामना खेळत नाही. या विश्वचषक आणि आशिया चषकात कर्णधार म्हणून त्याच्याकडून काही चुका झाल्या आहेत. पण या पराभवाला तो एकटाच जबाबदार नाही. हा संपूर्ण यंत्रणेचा दोष आहे कारण गेल्या एक वर्षापासून आपल्या खेळाडूंना प्रशिक्षक कोण हेच माहीत नाही. तुम्ही एकटे बाबरला बळीचा बकरा बनवू शकत नाही. या खराब कामगिरीसाठी बाबर आझमला बळीचा बकरा बनवू नये. पाकिस्तान संघाच्या दुरवस्थेसाठी त्याने संपूर्ण पाकिस्तान क्रिकेट व्यवस्थेला जबाबदार धरले आहे.

पाक संघाने 9 पैकी फक्त 4 सामने जिंकले

पाकिस्तान संघाने या विश्वचषकात साखळी टप्प्यात 9 सामने खेळले, चार जिंकले आणि पाच गमावले. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानचा संघ 5 सामने हरला आहे. फलंदाज म्हणून बाबरच्या कामगिरीवरही निशाणा साधला जात आहे. त्याला नऊ सामन्यांत केवळ 320 धावा करता आल्या.

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय
Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
BMC Election 2026: मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी
मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी
Jay Dudhane First Reaction After Arrested: मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
Embed widget