Champions Trophy Qualification Team : वर्ल्डकपचे साखळी सामने संपताच चॅम्पियन्स ट्रॉफीचे चित्रही स्पष्ट; दोन विश्वविजेत्यांसह तीन मातब्बर संघाना तगडा हादरा
पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद भूषवत आहे. साखळी टप्प्यातील सर्व 45 सामने संपल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणार्या सर्व संघांची नावेही निश्चित करण्यात आली आहेत.
Champions Trophy Qualification Team : विश्वचषक 2023 च्या साखळी टप्प्यातील सामने संपताच पाकिस्तानमध्ये 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे (Champions Trophy in Pakistan) चित्रही स्पष्ट झालं आहे. आयसीसीने पाकिस्तानशिवाय, विश्वचषक साखळी टप्प्यातील गुणतालिकेत अव्वल 7 संघांनाच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्थान मिळेल, असे स्पष्ट केले होते. अशा परिस्थितीत, आता साखळी टप्प्यातील सर्व 45 सामने संपल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणार्या सर्व संघांची नावेही निश्चित करण्यात आली आहेत.
Teams qualified for Champions Trophy 2025:
— Johns. (@CricCrazyJohns) November 12, 2023
India, Australia, England, South Africa, New Zealand, Pakistan, Afghanistan, Bangladesh. pic.twitter.com/Fic0GgFp8i
पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद भूषवत आहे. त्यामुळे या स्पर्धेत त्यांचा सहभाग आधीच निश्चित झाला होता. पाकिस्तान व्यतिरिक्त, पॉइंट टेबलच्या टॉप-7 संघांमध्ये, भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांनी आधीच वर्ल्ड कप सामने जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रता मिळवली होती. शेवटच्या दोन जागांसाठी चुरशीची शर्यत होती. ही शर्यत श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड आणि इंग्लंड यांच्यात होती.
ENGLAND QUALIFIED FOR CHAMPIONS TROPHY 2025....!!!!! pic.twitter.com/Y8ZT2euFgN
— Johns. (@CricCrazyJohns) November 11, 2023
शेवटच्या टप्प्यात फासे पलटले
एकेकाळी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटची दोन स्थानांच्या शर्यतीत इंग्लंड मागे पडले होता. त्याच वेळी, श्रीलंका आणि नेदरलँड्सचा टॉप-8 मध्ये समावेश होता. परंतु, शेवटच्या सामन्यांमध्ये परिस्थिती बदलली आणि इंग्लंड आणि बांगलादेशने पॉइंट टेबलच्या टॉप-8 मध्ये प्रवेश घेऊन श्रीलंका आणि नेदरलँड्सच्या आशा धुळीस मिळवल्या.
SRI LANKA IS OUT OF THE CHAMPIONS TROPHY 2025. pic.twitter.com/8XkDmDhsAV
— Johns. (@CricCrazyJohns) November 11, 2023
चॅम्पियन्स ट्रॉफीचे आठ संघ
भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड, बांगलादेश
Four wins and entry into the Champions Trophy ✅
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 10, 2023
An incredible World Cup campaign for Afghanistan 🇦🇫 #CWC23 pic.twitter.com/K3ib5pzakV
हे मोठे संघ गायब असणार
2023 च्या विश्वचषक स्पर्धेत शेवटच्या दोन स्थानांवर राहणाऱ्या श्रीलंका आणि नेदरलँड्स चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकले आहेत. या सोबतच वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि आयर्लंड सारखे इतर आयसीसी सदस्य देशही चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळणार नाहीत. हे तिन्ही संघ विश्वचषकासाठी पात्रही होऊ शकले नाहीत.
Bangladesh has qualified for the 2025 Champions Trophy, they are the last team to secure berth which is set to be held in Pakistan. pic.twitter.com/beMMuPBvun
— CricTracker (@Cricketracker) November 12, 2023
इतर महत्वाच्या बातम्या