(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vinesh Phogat Coach : 'मला वाटलं ती मरेल...', त्या रात्री विनेश फोगाट सोबत काय झालं? कोचने केला धक्कादायक खुलासा
Vinesh Phogat Coach Woller Akos : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून अपात्र ठरल्यानंतर आता कुस्तीपटूंच्या प्रशिक्षकाचे एक मोठे वक्तव्य केलं.
Vinesh Phogat Coach Statement : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले. या वेळी विनेशची ऑलिम्पिकमधील अप्रतिम कामगिरी पाहून करोडो भारतीयांना आशा होती की, यावेळी तरी ती भारताला एक तरी मेडल जिंकून देईल.
मात्र फायनलपूर्वीच वाढलेल्या वजनामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आले. जो विनेश आणि तमाम भारतीयांसाठी मोठा धक्का होता. मात्र, अंतिम सामन्यापूर्वी विनेशने तिचे वजन कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत तिला जीव गमवावा लागला असता, असा खुलासा तिच्या प्रशिक्षकाने केला आहे.
'त्या' रात्री विनेश फोगाट सोबत काय झालं?
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो कुस्तीच्या अंतिम सामन्यापूर्वी विनेश फोगटचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. मात्र, फायनल खेळण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी तिने आदल्या रात्री खूप मेहनत केली होती.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, विनेशचे प्रशिक्षक वोलार अकोस यांनी मोठा खुलासा केला आणि सांगितले की, उपांत्य फेरीनंतर विनेशचे वजन 2.7 किलो अधिक वाढले होते. त्यावेळी तिने एक तास वीस मिनिटे व्यायाम केला आणि तरीही 1.5 किलोग्रॅम जास्त वजन होत.
प्रशिक्षक पुढे म्हणाले की, तिच्या अंगावर घामाचा थेंबही दिसत नव्हता. कोणताही पर्याय उरला नव्हता आणि मध्यरात्री ते पहाटे साडेपाचपर्यंत ती वेगवेगळ्या कार्डिओ मशीन आणि कुस्तीच्या चालींवर काम केले. एकाच वेळी सुमारे पाऊण तास ही तेच करत होती, त्यातही फक्त दोन-तीन मिनिटे विश्रांती घ्यायची मग पुन्हा सुरूवात करायची. एकदा तर ती जमिनीवर पडली, पण कसे तरी आम्ही तिला उठवले आणि तिने सौनामध्ये एक तास घालवला. मी मुद्दाम नाट्यमय काहीतरी लिहित नाही, परंतु वजन कमी करताना त्या रात्री तिचा जीव गेला असता, असे मला वाटत होते.
CAS चा आज येणार निर्णय
अंतिम फेरीतून अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटने रौप्य पदकाबाबत सीएएसकडे अपील केले होते. मात्र, 14 ऑगस्ट रोजी सीएएसने विनेशचे अपील फेटाळले होते. पण आज या प्रकरणावर CAS चा पूर्ण निर्णय येऊ शकतो की त्याचे अपील का फेटाळले गेले?
हे पण वाचा -
PKL Auction: ऐतिहासिक! प्रो कबड्डीने बनवला सर्वाधिक करोडपती बनवण्याचा रेकॉर्ड, 8 जण झाले कोट्यधीश