एक्स्प्लोर

PKL Auction: ऐतिहासिक! प्रो कबड्डीने बनवला सर्वाधिक करोडपती बनवण्याचा रेकॉर्ड, 8 जण झाले कोट्यधीश

Pro Kabaddi League auction Day 1 : प्रो कबड्डी लीगच्या लिलावात सचिन तन्वर, मोहम्मदरेजा शादलूला, गुमान सिंग यांसारख्या आठ खेळाडूंवर करोडो रुपयांचा वर्षाव झाला, तर लिलावाच्या पहिल्या दिवशी असे अनेक खेळाडू होते ज्यांच्यावर कोणीही बोली लावली नाही. लिलावाचा दुसरा दिवस 16 ऑगस्टला होणार आहे.

PKL 11 Auction Crorepati Players : प्रो कबड्डी लीग 2024 च्या 11व्या हंगामाचा थरार लवकरच रंगणार आहे. त्यासाठी आता 16 ऑगस्ट रोजी मुंबईत लिलाव सुरू आहे आणि लिलावाच्या पहिल्याच दिवशी इतिहास रचला गेला आणि एकूण 8 खेळाडू करोडपती झाले. सचिन तन्वर हा लिलावात खरेदी केलेला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्यांच्याशिवाय पवनकुमार सेहरावत, सुनील कुमार आणि गुमान सिंग यांनाही चांगली किंमत मिळाली आहे.

तामिळ थलायवासने स्टार रेडर सचिन तन्वरसाठी 2 कोटी 15 लाखांची बोली लावली. सचिनची मूळ किंमत तीस लाख रुपये होती. PKL च्या इतिहासात सर्वाधिक रेड पॉइंट मिळवणारा खेळाडू परदीप नरवालला बेंगळुरू बुल्सने 70 लाख रुपयांना विकत घेतले. त्याचवेळी अनुभवी बचावपटू सुरजीत सिंगला जयपूर पिंक पँथर्सने 60 लाख रुपयांना खरेदी केले.

पहिल्याच दिवशी आठ खेळाडू झाले करोडपती

या लिलावात पीकेएलच्या इतिहासात विक्रमी संख्येने खेळाडू 1 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील झाले. आजच्या खेळाडूंच्या लिलावात सचिन, मोहम्मदरेजा शादलूला, गुमान सिंग, पवन सेहरावत, भरत, मनिंदर सिंग, अजिंक्य पवार आणि सुनील कुमार हे एक कोटी रुपयांच्या क्लबचा भाग होते. 

सचिन तन्वरला 2.15 कोटी रुपये मिळाले. इराणचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मदरेजा शादलूला हरियाणा स्टीलर्सने 2.07 कोटी रुपयांना विकत घेतले. गुमान सिंगला गुजरात जायंट्सकडून लिलावात 1.97 कोटी रुपये मिळाले. 
पवन सेहरावतला तेलुगू टायटन्सने 1.725 कोटी रुपयांना विकत घेतले. भरतला 1.30 कोटी रुपये मिळाले. मनिंदर सिंगला 1.15 कोटी रुपये, अजिंक्य पवारला 1.107 कोटी रुपये आणि सुनील कुमारला यू मुंबाने 1.015 कोटी रुपये दिले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget