Vinesh Phogat Video : विनेश फोगाटची प्रकृती खालावली अन् अचानक पडली बेशुद्ध...; कार्यक्रमादरम्यान मग काय घडलं?
Vinesh Phogat Fainted : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विनेश फोगट बेशुद्ध अवस्थेत दिसत आहे.
Vinesh Phogat News : पॅरिस ऑलिम्पिक 2024 हे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटसाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हते. आता विनेश पॅरिसहून घरी परतली आहे. भारतात आल्यावर तिचे भव्य स्वागत करण्यात आले. दिल्ली विमानतळापासून ते गावी पोहोचेपर्यंत चाहत्यांनी विनेशला भरभरून प्रेम दिले. पण गावात पोहोचल्यानंतर तिची प्रकृती खालावली आणि ती अचानक बेशुद्ध झाली.
विनेशच्या बेशुद्ध पडल्याचा व्हिडिओही समोर आला आहे, विनेशला तिच्या हरियाणातील बलाली गावात सन्मानित करण्यात आले. विनेशला तिचे समर्थक आणि गावातील खाप पंचायत सदस्यांनी सुवर्णपदक देऊन गौरविले. या कार्यक्रमादरम्यान ती बेशुद्ध पडली.
व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, सत्कार समारंभात विनेश बेशुद्ध झाली आणि तिच्याभोवती बरेच लोक बसलेले आहेत, ज्यात कुस्तीपटू बजरंग पुनिया देखील आहे. विनेशला बेशुद्धावस्थेत पाहून तेथे उपस्थित लोक चिंतेत दिसत आहे. विनेशचा हा व्हिडिओ nnis Sports ने X च्या माध्यमातून शेअर केला आहे. पहा...
PARIS TO BALALI
— nnis Sports (@nnis_sports) August 17, 2024
It's a hectic day for Vinesh Phogat. She's traveling more than 20 hrs. #VineshPhogat #ParisOlympics2024 #wrestling #Paris2024 #ParisOlympics #Olympics pic.twitter.com/ZC5vEl8jYh
थकव्यामुळे बिघडली प्रकृती
पॅरिसहून आल्यानंतर विनेशने रोड शो आणि सत्कार समारंभातही सहभाग घेतला. या लांबच्या प्रवासामुळे आणि व्यस्त वेळापत्रकामुळे विनेशची प्रकृती बिघडली असावी. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विनेशने मनातील भावना केल्या व्यक्त
पॅरिस ऑलिम्पिकमधून परतल्यावर झालेल्या भव्य स्वागतामुळे आनंदी झालेल्या विनेशने सांगितले की, तिला तिच्या गावातील बलाली येथील महिला कुस्तीपटूंना प्रशिक्षण देता आले तर ती तिच्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल. या गावातून एकही कुस्तीगीर निघाला नाही तर ती निराशा होईल. आम्ही मार्ग मोकळा केला आहे, आमच्या कामगिरीद्वारे आशा दिली आहे. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की या गावातील महिलांना साथ द्या. भविष्यात आमची जागा घेण्यासाठी त्यांना तुमचा पाठिंबा, आशा आणि विश्वास आवश्यक आहे.
100 ग्रॅम जास्त वजनामुळे ठरली अपात्र
विशेष म्हणजे विनेश 50 किलो कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. तिने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, परंतु अंतिम फेरीच्या दिवशी 100 ग्रॅम वजनामुळे ती अपात्र ठरली. यानंतर भारतीय कुस्तीपटूने रौप्य पदकाची मागणी केली, ती फेटाळण्यात आली.